
परंडा-ऐतिहासिक भुईकोट किल्ला येथे वीररत्न शिवा काशीद यांचा स्मृतीदिन,बलिदान दिनानिमित्त अभिवादन.
- प्रतिनिधी : फारूख शेख :-करताना प्रमोद वेदपाठक,ता नाजी घोडके,प्रकाश काशीद,संतोष भालेकर आदिसह शि व प्रेमी ! परंडा ,ता.१३(बातमीदार ) स्वराज्याच्या संरक्षणा साठी आपल्या बलिदानाची आहुती देणारे शिवाजी महारा जांचे विश्वासु मावळे वीर शिवा काशीद हे इतिहासात का यम अजरामर झाले.
- जन्माला शिवाजी काशीद म्हणुन जन्मले असले तरी शेव टच्या क्षणी शिवाजी महाराजांच्या नावाने वीरमरण पत्कर ले हे लाखमोलाचे आहे.असे मत ज्ञानेश्वरी शिक्षण संस्था अध्यक्ष तानाजी घोडके यांनी व्यक्त केले.

- वीररत्न शिवा काशीद यांच्या स्मृतीदिनानिमित्त रविवार ता.१३ रोजी शहरातील ऐतिहासिक भुईकोट किल्ला येथे अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला.
- यावेळी व्हाईस आॕफ मीडिया जिल्हाउपाध्यक्ष प्रकाश का शीद,ज्ञानेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तानाजी घोडके, सुव र्णकार संघटनेचे मराठवाडा सचिव प्रमोद वेदपाठक यां च्या हस्ते प्रतिमापुजन करण्यात आले.
- सिद्दी जौहारने शिवाजी महाराजांना कैद करण्यासाठी प न्हाळगडाला वेढा दिला होता.
- या कैदेतुन राजांची सुटका करण्यासाठी शिवाजी महारा जांचा हुबेहुब वेश परिधान करुन सिध्दी जोहारला भेटण्या साठी गेलेल्या वीर शिवा काशीद यांना प्राणाचे बलिदान द्यावे लागल्याचा इतिहास आहे.
- यावेळी प्रकाश काशीद यांनी ऐतिहासीक दाखले देत वीर शिवा काशीद यांच्या जीवनकार्यासह,चित्तथरारक प्रसंगा सह बलिदानदिनाची माहिती सांगितली.
- यावेळी व्यापारी संतोष भालेकर,विशाल काशीद,मेडिकल असोशियशनचे अतुल गोरे,दिपक तनपुरे, उमेश यादव, सं तोष गोडगे, डाॕ.नानासाहेब गरड विरेंद्रबाॕबी काशीद, मयुर डाके,करण काशीद,आदिसह नाभिक समाजातील बांधव, शिवप्रेमी नागरीकांची उपस्थिती होती.

- नुकतेच युनोस्कोच्या फ्रान्सची राजधानी पॕरीस येथील ४७ व्या युनोस्कोच्या सुरु असलेल्या बैठकीत राज्यातील छञ पती शिवाजी महारांजाच्या ११ गडकोट किल्ल्यांना जाग तिक वारसा स्थळ म्हणुन मान्यता मिळाली आहे.
- त्यापैकीच एक “पन्हाळा” गड आहे. याच पन्हाळगडावर वीर शिवा काशीद यांच्या पराक्रमाची गाथा,बलिदान इति हासात सर्वश्रुत आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






