नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , 2 हजार 985 उमेदवारांनी दिली पोलिस भरतीची चाचणी,31 जानेवारी पर्यंत सुरू असणार भरती प्रक्रिया. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

2 हजार 985 उमेदवारांनी दिली पोलिस भरतीची चाचणी,31 जानेवारी पर्यंत सुरू असणार भरती प्रक्रिया.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

रिपोर्टर: सचिन ना कोयरे-(अकोला बाजार): यवतमाळ जिल्हा पोलिस दलाच्या पदभरतीला सुरुवात झाली आहे.३०२ जागांसाठी ही भरती होत आहे. यामध्ये ५८ जागा पोलिस वाहन चालकाच्या आहेत. शिपाईपदासाठी २२ हजार ३०५ उमेदवारांनी अर्ज केला आहे. त्यामध्ये ८ हजार ३५० उमेदवार उच्चविद्याविभूषित आहेत.तर वाहन चालकांसाठी ४ हजार ८० अर्ज आले आहेत. त्यापैकी दोन हजार १०१ जण उच्च विद्या घेतलेले आहेत. आतापर्यंत ४ हजार ८० जणांना बोलाविण्यात आले. यापैकी २ हजार ९८५ जण भरतीसाठी उभे राहिले आहेत. बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. कुठल्याही क्षेत्रातील पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतले असेल तरी रोजगार मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळेच अनेक उच्चविद्याविभूषित तरुण या भरतीत आपले नशीब आजमावत आहेत. आतापर्यंत २ हजार ९८५ जणांनी मैदानी चाचणी दिली. त्यामध्ये ३५९ जण छाननीत बाद झाले, तर मैदानी चाचणीला पात्र ठरलेल्या २ हजार ६२६ जणांपैकी १ हजार ५९५ जण उत्तीर्ण झाले. १ हजार ३१ जण अनुत्तीर्ण झाले आहेत.

सोमवारपासून पोलिस शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया होत आहे.यापूर्वी चालक पदासाठी भरती झाली. ३१ जानेवारीपर्यंत भरती प्रक्रिया चालणार असल्याचे सांगितले जात आहे. प्रत्यक्ष भरतीला गैरहजर राहणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. आतापर्यंत दिवसाला ८०० उमेदवार बोलविले जात होते. पुढे १ हजार व नंतर १, ६०० पर्यंत उमेदवार बोलविण्याचे टार्गेट ठेवण्यात आले आहे. सरकारी नोकरीची प्रत्येकालाच आस लागली आहे. सरकारी नोकराला सामाजिक मान्यताही अधिक आहे. त्यामुळे जागा कुठलीही असो साधा कार्यालयीन शिपाई असला तरी त्यासाठी शिक्षणाचा विचार न करता उच्च शिक्षण घेतलेलेसुद्धा स्पर्धेत उतरतात.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा  https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा