नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , अकोला बाजार येथे सार्वजनिक मुतारी, घर व शौचालय पाडून पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मिळालेले घरकुल उभारण्यात येत आहे……… – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

अकोला बाजार येथे सार्वजनिक मुतारी, घर व शौचालय पाडून पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मिळालेले घरकुल उभारण्यात येत आहे………

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

रीपोर्टर:सचिन ना कोयरे:अकोला बाजार येथे चौपली जवळ वॉर्ड क्रमांक एक येथील ग्राम पंचायत मालकीचे पक्के असलेले सार्वजनिक मुतारी घर व शौचालय पाडून सदर जागेवर पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मिळालेले घरकुल उभारण्यात येत आहे अशी ग्राम पंचायत अकोला बाजार ला माहिती मिळाली असता ग्राम पंचायत सचिव व सर्व सदस्य गण त्या ठिकाणी पहायला आणि चौकशी करायला गेले असता त्या ठिकाणीचे पक्के असलेले सार्वजनिक मुतारी घर व शौचालय पाडलेल्या अवस्थेत,20 बाय 12 असा एकूण 240 sq.foot जागा अवैधरित्यापणे कब्जा केल्याचे सर्व पंचासमक्ष दिसून आले.या जागेवर कब्जा मिळवनारा चंद्रभान टेकाम याला सचिव व सदस्य पंचांनी विचारणा केली असता,सरपंच योगेश राजूरकर हा माझा नातेवाईक आहे आणि त्यानेच मला सदर जागेवर अतिक्रमण करायला सांगितले. त्यामुळे आपण माझे काहीच करू शकत नाही असे सचिव व सदस्य गणांना बोलून अश्लील शिवीगीळ केली.सदर घटनेची हकिकत उपसरपंच आणि सदस्यांनी सरपंच योगेश राजूरकर यांना विचारली तेव्हा सरपंचांनी उडवाउडवीची उत्तरे दिली आणि ग्राम पंचायत सचिव व सदस्यांना कोणत्याही प्रकारे विचारपूस अथवा विश्वासात न घेता सरपंचांनी मनमानी कारभार करत चालू असलेले सार्वजनिक मुतारी घर व शौचालय पाडण्यास सदर व्यक्तीस मदत केली असा सदस्य गणांनी आरोप करत दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करून उपसरपंच,सर्व सदस्यांनी, गट विकास अधिकारी पंचायत समिती यवतमाळ तहसीलदार आणि वडगाव जंगल पोलिस स्टेशन मध्ये तक्रार देत केली आहे.                                                                                       सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा  https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा