
“एकाच इमारतीत 9 दिवस RTI फिरला? वसई-विरार महापालिकेतील शिस्तीचा खेळखंडोबा..!”
- प्रतिनिधी : अनंत पाटील :- विरार, ता. 17 जुलै 2025 वसई-विरार महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात माहि ती अधिकार कायदा 2005 अंतर्गत 2 जुलै 2025 रोजी सादर झालेला ऑनलाईन अर्ज क्रमांक PLMCO/ R/ 2 025/60522 तब्बल 9 दिवसांनी, म्हणजे 11 जुलै 20 25 रोजी कार्यवाहीसाठी पुढे वर्ग करण्यात आला, अशी माहिती अर्जदारास 17 जुलै रोजी ईमेलद्वारे देण्यात आली.

- RTI कायद्यातील कलम 6(3) नुसार, जर मागितलेली मा हिती संबंधित इतर प्राधिकरणाकडे असेल, तर अर्ज 5 दि वसांच्या आत त्या योग्य प्राधिकरणाकडे वर्ग करणे काय द्याने बंधनकारक आहे.
- मात्र वसई-विरार महानगरपालिकेने यामध्ये स्पष्टपणे दिरं गाई केली असून, कायद्याचे सरळसरळ उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले आहे.
- या प्रकरणावरून वसई-विरार महापालिकेतील प्रशासकी य कार्यपद्धतीतील गोंधळ आणि जबाबदारीच्या अभावाचे दर्शन घडते.
- RTI अर्ज ऑनलाईन प्रणालीद्वारे लगेच प्राप्त होतो, हे स र्वश्रुत असूनही, एकाच प्रशासकीय इमारतीत अर्ज फिरत राहतो आणि 9 दिवसांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे पोहोच तो, ही बाब अतिशय गंभीर आहे.

- आरटीआय कार्यकर्ता आणि पत्रकार अनंत पुंडलिक पा टील (पालघर जिल्हा कार्याध्यक्ष – महाराष्ट्र राज्य माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ) यांनी या प्रकरणी मनपा आ युक्तांकडे अधिकृत तक्रार दाखल केली असून, संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगात्मक कारवाई करण्याची आणि विभागीय चौकशीची मागणी केली आहे.
- त्यांनी आपल्या तक्रारीत स्पष्ट नमूद केले आहे की, अर्जा ची नोंद मुद्दाम उशिरा दर्शवून अर्जदाराची दिशाभूल कर ण्यात आली.
- असून, यामुळे प्रशासनातील पारदर्शकता, कार्यक्षमता आ णि कायद्याविषयीची निष्ठा यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
- यासोबतच त्यांनी मागील सहा महिन्यांतील सर्व RTI अ र्जांची फेरतपासणी करण्याची, संबंधित अधिकाऱ्यांना लेखी सूचना देण्याची आणि मूळ अर्ज दिनांक (2 जुलै 2025) पासून कार्यवाही वैध मानण्याची मागणी केली आहे.

- त्यांच्या म्हणण्यानुसार, असे प्रकार पुन्हा होऊ नयेत म्हणू न प्रभावी नियंत्रण यंत्रणा आणि उत्तरदायित्व निश्चित कर णे अत्यावश्यक आहे.
- अन्यथा, माहितीचा अधिकार केवळ कागदापुरता मर्यादि त राहील आणि जनतेचा विश्वास डळमळीत होईल.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











