
विरार पूर्व – नाना नाणी पार्क, गीतांजली शाळेजवळ भर रस्त्यावर चिकणचे वेस्टेज ; VVCMC झोपा काढतेय का…. ?
- प्रतिनिधी : अनंत पाटील :- विरार पूर्वेतील नाना-नाणी पार्क परिसर,गीतांजली शाळेजवळील रस्त्यावर चिकन वि क्रेत्यांकडून दररोज उघड्यावर कचरा टाकला जातो.
- सडलेले मांस, रक्त, हाडं आणि कुजणारा जैविक कचरा यामुळे प्रचंड दुर्गंधी व घाण निर्माण होते. शाळकरी मुलं, महिला, नागरिक यांना रोज त्रास सहन करावा लागतो.

- प्रशासनाला याची माहिती असूनही कोणतीही ठोस कार वाई केली जात नाही. विक्रेत्यांना रोखण्यासाठी ना फल क, ना दंड, ना पर्यायी व्यवस्था काहीच नाही. जणू त्यांना रस्त्यावर कचरा टाकण्याची मुभाच दिली आहे.
- घाण उचलणं नव्हे, घाण होऊच न देणं ही खरी जबाबदा री असते. ती पालिका झटकून टाकतेय. वारंवार होणारा त्रास, वाढती अस्वच्छता आणि वाढता आरोग्यधोका या कडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतंय का.
- अशा रोजच्या विकृतीला जर प्रशासन मूक संमती देत असेल,तर उद्या ही घाण सार्वजनिक रोषात रूपांतरित होईल, हेही नक्की.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











