
पी.ई.एस.मॉडर्न इंग्रजी माध्यमाच्या हायस्कूलमध्ये गुणवंतांचा सत्कार.
- प्रतिनिधी : नामदेव मेहेर :- यमुनानगर निगडी येथील पी.ई. एस.मॉडर्न इंग्लिश मिडियम शाळेमध्ये दहावीच्या प रीक्षेत नेत्रदीपक यश प्राप्त करणाऱ्या तसेच स्कॉलरशिप परीक्षेमध्ये प्राविण्य मिळवणाऱ्या गुणवंतांचा सत्कार सो हळा नुकताच पार पडला.
- या कार्यक्रमास अभिनव एज्युकेशन सोसायटी आळंदीचे चेअरमन आदरणीय गणेश पांडुरंग गरुड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

- तसेच शाळेचे चेअरमन दिपक मराठे, व्हिजीटर अतुल फा टक,शाळेच्या मुख्याध्यापिका गौरी सावंत,पालक संघाच्या वंदना मुळ्ये,मेघना बनसोडे,रवींद्र सानप,वैशाली गिलबिले उपस्थित होत्या.
- यावेळी पाहुण्यांच्या हस्ते गुरुपौर्णिमेनिमित्त शिक्षकांचा स त्कार करण्यात आला. तसेच प्रो.डॉ.अतुल फाटक सरांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना पंचम गुणसूत्र सांगून मार्गदर्शन केले.
- प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणातून छत्रपती शिवाजी महाराज, अरुणिमा सिन्हा, जॉर्ज वॉशिंग्टन, थॉमस एडिस न यासारख्या व्यक्तीरेखांमधून विद्यार्थ्यांनी आपली ध्येय निश्चिती करावे याचे मार्गदर्शन केले.
- यावेळी माजी विद्यार्थी संघाची स्थापना माजी विद्यार्थ्यां च्या हस्ते करण्यात आली.तसेच सायन्स क्लबचे उदघाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.

- यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसाय टीचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.गजानन एकबोटे,कार्यवाह प्रा.शाम कांत देशमुख,सहकार्यवाह प्रा. डॉ. ज्योत्स्ना एकबोटे यांनी कौतुक केले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











