नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , शालेय पोषण आहारात आता बुधवारपासून (ता. २२) विद्यार्थ्यांना अंडी, पुलाव किंवा अंडा बिर्याणी मिळणार – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

शालेय पोषण आहारात आता बुधवारपासून (ता. २२) विद्यार्थ्यांना अंडी, पुलाव किंवा अंडा बिर्याणी मिळणार

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : योगेश सुळे :- शालेय पोषण आहारात आता बुधवारपासून (ता. २२) विद्यार्थ्यांना अंडी, पुलाव किंवा अंडा बिर्याणी मिळणार आहे. अंडी न खाणाऱ्यां साठी केळी, चिकू, पेरी यापैकी एक फळ दिले जाणार आहे.
  • आठवड्यातील बुधवार किंवा शुक्रवार या पैकी कोण त्याही एका दिवशी प्रतिविद्यार्थी पाच रुपयांप्रमाणे हा खर्च केला जाणार आहे.
  • राज्य सरकारच्या निर्णयानुसार जिल्हा परिषदेने इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळांना (जिल्हा परिषदेसह खासगी अनुदानित शाळा) पत्रव्यवहार केला आहे.
  • स्थानिक बाजारातून संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकां नी अंडी व फळे विकत घ्यायची आहेत.
  • त्यासाठी पहिल्या सहा आठवड्यांच्या खर्चापोटी प्रत्येक विद्यार्थ्याला ३० रुपये, याप्रमाणे अग्रिम दिला जाणार आहे.
  • आठवड्यातील बुधवारी किंवा शुक्रवारी विद्यार्थ्यांना नवीन बदलानुसार आहार मिळेल, यादृष्टीने पोषण आहाराच्या योजनेसाठी पात्र चार हजार ९५ शाळांच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात अंडी व फळांची खरेदी करायची आहे.
  • अंडी खाणाऱ्या व न खाणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी तयार करून त्यांना अंडी व फळे द्यायची आहेत. दिवाळी सुटीनंतर बुधवारपासून शाळा सुरु होणार असून विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी किंवा या आठवड्यातील शुक्रवारी नवीन बदलानुसार आहार मिळेल.
  • शालेय पोषण आहाराचे लेखाधिकारी डॉ. वैभव राऊत यांच्या मार्गदर्शना खाली त्यासंबंधीची कार्यवाही सुरु आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा