
अनधिकृत A/C वापर प्रकरण – अधिकाऱ्याची कबुली आणि नियमांची उघडपणे पायमल्ली; कायद्यापेक्षा अधिकारी मोठे… !
- प्रतिनिधी : अनंत पाटील :- वसई येथील उपनिबंधक,स हकारी संस्था या सार्वजनिक प्राधिकरण कार्यालयात शा सन निर्णय दि. 25/05/2022 नुसार अधिकृत परवानगी नसतानाही वातानुकूलित यंत्र वापरण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
- माहिती अधिकार कार्यकर्ता व पत्रकार श्री.अनंत पुंडलिक पाटील (कार्याध्यक्ष–पालघर जिल्हा, माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र) यांनी या कार्यालयाला भेट दि ली असता, सदर वातानुकूलन यंत्र प्रत्यक्ष कार्यरत स्थिती त आढळून आले.

- कार्यालय प्रमुख अधिकाऱ्याशी संवाद साधल्यावर त्यांनी स्पष्ट कबूल केले की, संबंधित वातानुकूलन यंत्र त्यांच्या प दभार स्वीकृतीपूर्वीपासून कार्यरत आहे आणि त्याचा वाप र देखील चालू आहे. हे वक्तव्य उपलब्ध व्हिडीओ स्वरूपा त नोंदवले गेले आहे.
- शासन निर्णय दि. 25/05/2022 नुसार केवळ S-30 वेतनस्तर (₹1,44,200 ते ₹2,18,200) अथवा त्यापेक्षा अधिक वेतनश्रेणीतील अधिकाऱ्यांनाच वातानुकूलनाच्या सुविधेचा लाभ घेता येतो.
- सदर अधिकारी ही अट पूर्ण न करता, अनधिकृतपणे शा सकीय यंत्रणेतील वीज,साधने आणि सुविधा वापरत अस ल्याचे दिसून आले आहे. ही कृती केवळ नियमभंग नाही, तर पदसत्तेचा सर्रास गैरवापर ठरतो.
- प्रशासकीय शिस्त, सेवा आचारसंहिता आणि नैतिकतेला हरताळ फासणाऱ्या या प्रकारावर तातडीने कारवाईची गरज असून, संबंधित अधिकाऱ्याच्या कृत्यामुळे शासन निर्णयाची विश्वासार्हता धोक्यात आली आहे.
- पदाचा वापर करून नियमांचे उल्लंघन करत केलेल्या या कृत्याबद्दल जबाबदारी निश्चित केली जाणे अपेक्षित आहे.
- या प्रकरणाची गंभीर दखल घेत, श्री.अनंत पुंडलिक पाटी ल यांनी पुढील कार्यवाहीसाठी आवश्यक कागदपत्रांसह विभागीय आयुक्त, कोकण विभाग आणि मा.मुख्यमंत्री, म हाराष्ट्र शासन यांच्याकडे तक्रार पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
- ही तक्रार केवळ एका अधिकाऱ्याच्या गैरवर्तनाविरोधात नसून, सरकारी कार्यालयांतील सत्तेच्या बेकायदेशीर वाप राच्या विरोधात लढा आहे.
- शासन निर्णयांचे पायमलन,सार्वजनिक मालमत्तेचा अनधि कृत वापर आणि प्रशासकीय बेफिकिरी यांच्यावर आळा घालण्यासाठी या प्रकाराचा परिणामकारक पाठपुरावा करण्यात येणार आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






