
अनिलकुमार पवार यांच्या घरात १ कोटी ३२ लाख महत्वाची कागदपत्रे.
- प्रतिनिधी : नितीन राणे :- वसई-विरार महापालिकेचे मा जी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या निवासस्थानावर छापा टाकण्यासाठी पोहोचलेल्या सक्तवसुली संचालना लयाचे (ईडी) पथक पाऊण तास बाहेर तात्कळत उभे होते.
- बराच काळ घरात प्रवेश न मिळाल्यामुळे अखेर ईडीच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलीस आणि चावी बनवणाऱ्या च्या मदतीने पवार यांच्या घरात प्रवेश केला.

- मंगळवारी ईडीने याप्रकरणी पवार यांच्या निवासस्थाना सह १२ ठिकाणी छापे टाकले. त्यात एक कोटी ३३ लाख रुपये व कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
- वसई – विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांची मुंबई महानगर झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिक रणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.
- तीन वर्षे ते या पदावर कार्यरत होते. पालिकेच्या सभागृहा त सोमवारी पवार यांचा छोटेखानी निरोप समारंभ झाला. त्यानंतर मंगळवारी ईडीचे पथक थेट त्यांच्या निवासस्था नी दाखल झाले.
- ईडीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खूप वेळ पवार यांच्या घराचा दरवाजा न उघडल्यामुळे अखेर त्यांनी स्था निक पोलिसांची मदत मागितली.
- त्यानंतर स्थानिक पोलिसांचे पथक पवार यांच्या घराबाहेर जमा झाले. त्यांच्या मदतीने चावी बनवणाऱ्याला बोलव ण्यात आले. त्याने पोलिसांच्या उपस्थितीत चावी बनवून दरवाजा उघडून दिला.
- त्यानंतर अधिकाऱ्यांनी पवार यांच्या घरात प्रवेश केला. या कालावधीत इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये काही महत्त्वाचा डेटा डिलीट करण्यात आल्याचा ईडीला संशय आहे.
- त्याचीही पडताळणी करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
- ईडीने मंगळवारी पवार यांच्या निवासस्थानासह १२ ठिकाणी छापे टाकले. त्यात वसई-विरार, मुंबई व नाशिक येथील ठिकाणांचा समावेश आहे.
- ईडीने वसई – विरार परिसरात बेकायदेशीर राहिवासी व व्यावसायिक इमारतींच्या बांधकामांप्रकरणी मोठी कारवा ई हाती घेतली आहे.
- या कारवाईत ईडीने एक कोटी ३३ लाख रुपये व मालम त्तांचे कागदपत्रे जप्त केली आहेत.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











