
वीज खांबावर चढण्यासाठी बनवली शिडी ससाळेतील वायरमन महेश तांबे यांच्या कल्पना शक्तीला सलाम.
- प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- कामात एकाग्रता असली ते काम सोपे, सुरक्षित व लवकर कसे होईल याक डे त्याचे लक्ष असते विना अपघात आपला दैनंदिन उपक्र म कसा पार पडेल.
- गावागावातून जाणारी वीज खंडित होणार नाही याची का ळजी वायरमन घेत असतो.

- राजापूर तालुक्यातील ससाळे येथील कर्तव्यदक्ष वायरमन महेश रत्नू तांबे हे १४ वर्षे राजापूर तालुक्यातील जांभव ली, हसोळ,सोल्ये रेल्वेस्टेशन,ससाळे व आंगले या गावात आपली प्रामाणिकपणे सेवा बजावत आहेत.
- यांनी वीज खांबावर चढण्यासाठी आपल्या कल्पना शक्ती चा वापर करत शिडी बनवली ही शिडीची सहज बाईक वरुन सहज ने-आण करता येते पावसाळ्यात कोकणात जास्त पाऊस पडत असल्याने वीज पोल निसरडे होतात.
- वायरमनना लाईट गेल्यावर पोलवर चढून दुरुस्ती करणे भाग असते यावेळी वर चढताना जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.
- परंतु तांबे यांनी बनवलेली लोखंडी शिडी ही सलग नसून छोट्या छोट्या शिड्या एकात एक जोडून तुम्हाला हवी ते वढी उंच नेऊ शकता त्याशिवाय वर गेल्यावर त्यांच्याकडे लाकडाचा ओंडका असतोच.
- त्यावर हवा तेवढा वेळ बसून काम करता येते नंतर त्या शिड्या वेगवेगळ्या करुन पुन्हा एकत्र बांधून एका ठिका णाहून दुसरीकडे नेता येते.

- त्यांच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमा चे सर्वत्र कौतुक होत आहे अशी शिडी जर इतर वायरमन ने वापरली तर वीज खांबावर विना अपघात व सुरक्षित काम शकतो असे महेश तांबे यांनी सांगितले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











