
खापणे महाविद्यालयाची पूरग्रस्तांसाठी मदत फेरी.
- प्रतिनिधी : प्रमोद तरळ :- राजापूर तालुक्यातील रायपा टण येथील श्री मनोहर हरी खापणे महाविद्यालयाच्या रा ष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत दि. ८ ऑक्टोबर २०२५ रोजी महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी मदत फेरी काढण्यात आली.
- महाविद्यालयाच्या विशाल पटांगणात महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ.पी.एस.मेश्राम यांनी या रॅलीस हिरवा ध्वज दा खवून रॅली मार्गस्थ केली.

- सह्याद्री दर्शन, बाजारवाडी, जवळेथरतिठा, बाजारपेठ,कर त पाचल आठवडी बाजारात ही फेरी आली.’
- पूरग्रस्तांना मदत करा, मानवतेची कास धरा ‘, ‘पुरग्रस्तांना देऊया मदतीचा हात तीच होईल त्यांना खरीखुरी साथ,’ ‘पु सूया अश्रू महापूरग्रस्तांचे, गिरवू या खरेखुरे धडे माणुसकी चे,’ ‘सारे काही हरवले त्यांचे बळकट करूया हात, यासाठी तुमची हवी आहे मदतीची साथ ‘ यासारख्या घोषणांनी वि द्यार्थ्यांनी परिसर दणाणून सोडला होता.
- विद्यार्थ्यांच्या या मानवतेच्या सदकार्यास पाचल व परिस रातील अनेक दात्यांनी सढळ हाताने मदत केली. यावेळी विद्यार्थ्यांनी 11 हजार रुपयाची मदत संकलित केली.
- या रॅलीत राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिका री डॉ.विकास पाटील, प्रा.एस.व्ही. निंबाळकर, डॉ.बी.टी. दाभाडे, प्रा.एस.एस.धोंगडे, प्रा.एस.जी.चव्हाण, प्रा.पी. पी.राठोड, प्रा.एन.जी.देवन आदी मान्यवर सहभागी झाले होते.
- विद्यार्थ्यांनी केलेल्या या सदकार्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री.मनोहरजी खापणेसाहेब,सरचिटणीस श्री नरेश पाचल कर व सर्व संस्थापदाधिकाऱ्यांनी व प्र.प्राचार्य डॉ.पी.एस. मेश्राम यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व दातांचे ऋण व्यक्त केले आहे.
- महाविद्यालयाच्या या कामाबद्दल परिसरातून समाधान व्यक्त होत आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











