
महसूल दिन विशेषः कर्तव्यासोबत समाजसेवाही करा, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे आवाहन.
- प्रतिनिधी : संदीप कारके :- छत्रपती संभाजीनगर – मह सूल विभागाचा संपर्क समाजातील सर्व घटकांशी येतो. जीवनाचा असा एकही भाग नाही जो महसूल विभागाशी संबंधित नसतो.
- त्यामुळे महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सर्व समाजघट कांशी विनम्रतेने वागावे, असे मत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी व्यक्त केले.
- छत्रपती संभाजीनगर उपविभागामार्फत आज जिल्हाधि कारी कार्यालयातील नियोजन सभागृहात महसूल दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

- या कार्यक्रमात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी महसू ल कर्मचाऱ्यांना नोकरीचे कर्तव्य बजावत असताना सा माजिक उपक्रमांमध्ये सहभागी होऊन समाजसेवाही करण्याचे आवाहन केले.
- कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे,जि ल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी, उपजिल्हाधिकारी संगीता राठोड, उपविभागीय अधिकारी डॉ.व्यंकट राठोड, तहसीलदार कैलास वाघमारे आणि अपर तहसीलदार डॉ. परेश चौधरी उपस्थित होते.
- या कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी आ णि कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी स्वामी यांच्या हस्ते सन्मा न करण्यात आला.
- नायब तहसीलदार सतीश भदाणे, मंडळ अधिकारी कल्या ण वानखरे, सहायक महसूल अधिकारी श्रीधर दांडगे, ग्रा म महसूल अधिकारी स्वप्निल शेळके, महसूल सहायक शोभा टाक, वाहन चालक एम.एम. शेख, शिपाई समीर शेख आणि महसूल सेवक अण्णा जाधव यांचा यावेळी गौरव करण्यात आला.
- जिल्हाधिकारी स्वामी यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून उत्कृष्ट कार्य करून जनतेला सेवा देण्याचे आवाह न केले.
- त्यांनी कर्मचाऱ्यांना आपले कर्तव्य विनम्रतेने पार पाडण्या चे आणि अद्यावत तंत्रज्ञानाचा अंगिकार करून सेवेचा दर्जा उंचावण्याचे आवाहनही केले.
- कार्यक्रमात अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे यां नीही कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. डॉ.व्यंकट राठोड यांनी प्रास्ताविक केले तर रघुनाथ शेळके यांनी आभार मानले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






