
मॉडर्न हायस्कुलमध्ये स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांची राख्या बनविणे कार्यशाळा संपन्न.
- प्रतिनिधी : नामदेव मेहेर :- यमुनानगर निगडी येथील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न हायस्कुलमध्ये स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच राख्या बनविण्या ची कार्यशाळा घेऊन मुलांना खऱ्या स्वकमाईचा आनंद घेतला.

- मुलांना कच्च्या मालाची खरेदी,आकर्षक डिझाईनची रा खी बनवणे,ती दुकानदारांना विकणे असे अनेक अनुभव विद्यार्थ्यांना देण्याच्या उद्देशाने कार्यशाळा घेतल्याचे मुख्या ध्यापिका शारदा साबळे यांनी सांगितले.
- यावेळी पर्यवेक्षक विजय पाचारणे उपस्थित होते. स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्यांचे प्रदर्शन शा लेय सभागृहात आयोजित करण्यात आले होते.

- कला शिक्षिका कुसुम पाडळे यांच्या मार्गदर्शनाखाली वि द्यार्थ्यांनी राख्या तयार केल्या.
- कार्यशाळेचे आयोजन स्काऊट गाईड प्रमुख आशा कुंजी र, उपप्रमुख शिवाजी अंबिके यांनी केले. या कार्यशाळेतून भविष्यात स्वतःचा छोटा व्यवसाय करण्याचा आत्मविश्वा स आल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

- या उपक्रमाचे कौतुक संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.गजानन एकबोटे, कार्यवाह प्रा.शामकांत देशमुख,सहकार्यवाह प्रा. डॉ.ज्योत्स्ना एकबोटे,उपकार्यवाह प्रा.डॉ.निवेदिता एक बोटे,शाळा समिती अध्यक्ष प्रा.मानसिंग साळुंके,व्हिजिटर प्रमोद शिंदे,सदस्य राजीव कुटे यांनी केले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











