राजापूर आगारात उपहारगृह बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय.

  • प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- राजापूर आगारा तील एसटीचे उपहारगृह मागील अनेक महिन्यांपासून बंद असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
  • कोकणातील सर्वात मोठा गणेशोत्सव सण तोंडावर आ ल्याने मुंबईकर चाकरमानी बहुसंख्येने एसटीने तालुक्यात दाखल होणार असून किमान त्यापूर्वी तरी हे उपहारगृह सु रू करावे अशी मागणी काॅंग्रेस शहराध्यक्ष अजीम जैताप कर यांनी केली आहे.
  • राजापूर एस.टी आगारामध्ये असलेल्या उपहारगृहामुळे प्र वाशांची चांगली सोय होत होती. मात्र मागील काही महि न्यांपासून ते बंद करण्यात आले आहे.
  • त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. शासनाकडून एसटी प्रवाशांकरिता देण्यात आलेल्या विविध सवलती मुळे एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे.
  • मात्र राजापूर आगारात उपहारगृह नसल्याने प्रवाशांना च हा, नाश्ता,जेवण यासाठी आगारा बाहेर शोधाशोध करावी लागत आहे.
  • बाहेरुन येणाऱ्या गाड्या राजापूर आगारात अल्प कालाव‌ धीसाठी थांबत असल्याने एसटी उपहारगृहातून प्रवाशांना खाद्य पदार्थ घेणे सोयीचे ठरते होते.
  • अशातच आता आगामी महिन्यात गणेशोत्सव असल्याने या उत्सवासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी तालुक्यात दाखल होणार आहेत.
  • अशा स्थितीत उपहारगृह बंद असल्याने चाकरमन्यांची मो ठी गैरसोय होण्याची शक्यता आहे त्यामुळे गणेशोत्सवा पूर्वी एसटी उपहारगृह सुरु करावे अशी मागणी जैतापकर यांनी केली आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles