अनादी सिध्द शक्तीतुरा समाज संघ राजापूर मंडळाचा १५ वा वर्धापनदिन सोहळा उत्साहात संपन्न.

  • प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :-अनादी सिद्ध शक्ती तुरा समाज संघ राजापूर मंडळाचा १५ वा वर्धापन दिन दत्तमंदिर हातीवले येथे मंडळाचे संस्थापक विश्वनाथ उर्फ भाई गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संप न्न झाला.
  • सकाळच्या सत्रात ब्रीद पूजन, उपस्थित मान्यवर व जेष्ठ शाहिरांचा सत्कार, सागरीत मांड, नूतन शाहिरांना सागरीत करणे,ओळखपत्र वाटप करण्यात आले.
  • तसेच मंडळाचे कार्यवाह संतोष हातणकर यांनी गेल्या वर्षीचे इतिवृत्त वाचन, जमाखर्च,संघटना वाढी संदर्भातील मुद्दे सभागृहात मांडले.
  • तसेच मार्गदर्शक रवींद्र नागरेकर, खजिनदार कृष्णा नागरे कर, उपाध्यक्ष नारायण मिरगुले व जेष्ठ शाहिरांनी राजापूर तालुक्यात सांस्कृतिक भवन उभे रहावे अशी संकल्पना मांडली व त्यावर पुढील कालावधीत शासन दरबारी पाठ पुरावा करण्याचे ठरवण्यात आले.
  • यावेळी प्रमुख मान्यवर कोल्हापूरचे नामवंत शाहीर बळवं त चव्हाण,संगमेश्वरचे संदीप सावंत हजर होते.
  • तसेच शाहीर सत्यवान कारशिंगकर व गणपत बाईत शाहिरांनी डफावरील कला सादर करून सर्वांचे मनोरंजन केले.
  • यावेळी मंडळाचे दिनेश सोडये, सूरेश बाईत,सुनील कणेरे, विलास बावकर, गंगाराम गुरव,सुकांत आयरे,राजू कारशिं गकर,बापू राणे,शांताराम चांदे,संतोष माळकर व १५० शाहीर हजर होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles