
भाजपच्या लांजा दक्षिण मंडळ अध्यक्षपदी शैलेश खामकर तर उत्तर मंडळ अध्यक्षपदी विराज हरमले.
- प्रतिनिधी : लांजा : प्रमोद तरळ :- रविवार दि २० एप्रि ल २०२५ रोजी लांजा पक्ष कार्यालयात पार पडलेल्या बैठ कीत लांजा तालुका दक्षिण व उत्तर मंडळ अध्यक्ष जाहीर झाले असून दक्षिण मंडळ अध्यक्षपदी शैलेश खामकर व उत्तर मंडळ अध्यक्षपदी विराज हरमले यांची निवड करण्यात आली आहे.
लांजा तालुका भाजपाची बैठक नुकतीच पक्ष कार्यालयात पार पडली यावेळी दक्षिण मंडळाचे निवडणूक प्रमुख प्रशांत डिंगणकर व ऋषिकेश केळकर यांनी दक्षिण मंडळ अध्यक्षपदी शैलेश खामकर तर उत्तर मंडळ अध्यक्षपदी विराज हरमले यांची निवड जाहीर केली.
- दक्षिण आणि उत्तर मंडळ अध्यक्षपदी निवड झालेले महे श खामकर आणि विराज हरमले यांनी यापूर्वी तालुका सरचिटणीस पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली होती म्ह णून एकूणच त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांच्यावर पक्षाची नवीन जबाबदारी देण्यात आली आहे.

- यावेळी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष चंद्रकांत मांडवकर हे उपस्थित होते दोन्ही निवडणूक प्रमुखांच्या उपस्थितीत या नूतन तालुका अध्यक्षांना पदग्रहण करण्यात आले.

- यावेळी माजी शहराध्यक्ष गुरुप्रसाद तेली, जिल्हा सचिव संजय आयरे, कोटचे उपसरपंच रवींद्र नारकर, शक्ती केंद्र प्रमुख प्रथमेश बेंडल, शेखर सावंत, संकेत घाग, भरत को ळवणकर, शारदा गुरव, आरगाव सरपंच शमीका खामकर तसेच चंद्रकांत खामकर, वाघोजी खानविलकर, शामकांत साळवी, अनिल पन्हळेकर, राजेंद्र बाईंग व इतर पदाधिका री आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











