नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , शासनाचा नवीन आदेश; राष्ट्रीय अंडी समन्वय समितीच्या दराला मान्यता – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

शासनाचा नवीन आदेश; राष्ट्रीय अंडी समन्वय समितीच्या दराला मान्यता

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : भारत साळुंके :- केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेतून वार्षिक अंदाजपत्रका च्या पाच टक्के निधीतून नावीन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना अतिरिक्त पूरक पौष्टिक पदार्थ देण्याचा निर्णय झाला.
  • त्यानुसार शालेय पोषण आहारात अंडी व केळीसह इतर स्थानिक फळ द्यायला सुरवात झाली. पण, प्रति विद्यार्थी पाच रुपयांची अट सध्याच्या दराला धरून नव्हती.
  • या पार्श्वभूमीवर आता प्रति अंड्यासाठी सहा ते सहा रुपये ८५ पैसे मिळणार असून तसा शासन निर्णय झाला आहे.
  • नावीन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत मंजूर निधीतून २३ आठ वड्यासाठी नियमित पोषण आहारासोबत अंडी किंवा केळी देण्याचा निर्णय ७ नोव्हेंबरला झाला.
  • पण, अंड्याचा दर वाढवून मिळावा, पाच रुपयात अंडे मिळत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना अंडे मिळत नव्हते. काही शाळांमध्ये एक अंडे दोन विद्यार्थ्यांना द्यावे लागत होते.
  • त्यावर ‘अंडे सहा रुपयाला अन्निधी पाच रुपये असे वृत्त प्रकाशित केले होते. दुसरीकडे शिक्षक संघटना तसेच महिला बचत गटांनीही त्यासंदर्भात शासनाला निवेदने दिली होती.
  • त्यानुसार अधिवेशन संपताच शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने अंड्याचे दर वाढवून देण्याचा निर्णय घेतला.
  • आता राष्ट्रीय अंडी समन्वय समितीच्या संकेतस्थळा वरून अंड्याचे दर पाहून संबंधित जिल्हा परिषदांना तेवढा निधी मिळणार आहे.
  • अंडी खाणारे विद्यार्थी किती…?
  • शालेय पोषण आहारात सध्या अंडी व केळी दिली जात आहे. पण, अंडी खाणारे व फळे खाणारे विद्यार्थी किती याची आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही.
  • मार्गशीर्ष महिना असल्याने सध्या अंडी खाणारे विद्यार्थी कमी झाल्याचे सांगण्यात आले. तर काही विद्यार्थी कधी अंडी तर कधी केळी खातात, असेही सांगितले जात आहे. आता निधी देताना ही आकडेवारी महत्त्वाची असणार आहे.
  • शासनाच्या नवीन आदेशानुसार…
  • २०२३- २४ या आर्थिक वर्षात प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना आता अंडी व स्थानि क फळे देण्याचा निर्णय यापूर्वीच झाला आहे.
  • पण, अंडे किंवा स्थानिक फळ, यासाठी प्रतिविद्यार्थी पाच रुपये खर्च करावेत, अशी अट होती. तेवढ्या रकमेत अंडे येत नसल्याने शाळांसमोर पेच निर्माण झाला होता.
  • त्यावर शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने नवीन आदेश काढून ’राष्ट्रीय अंडी समन्वय समिती’ च्या संकेत स्थ ळावरील दरानुसार अंड्याची रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा