नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , थंडीमुळे उबदार कपड्यांचा बाजार फुलला; गेल्यावर्षीच्या तुलनेत 20 टक्क्यांनी वाढली मागणी – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

थंडीमुळे उबदार कपड्यांचा बाजार फुलला; गेल्यावर्षीच्या तुलनेत 20 टक्क्यांनी वाढली मागणी

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : राजाराम खांगड :- शहर व परिसरात तापमानात घट झाल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. त्यामुळे उबदार कपड्यांना मागणी वाढली आहे.
  • शहरातील अनेक ठिकाणी उबदार कपडे विक्रीची दुका ने थाटली आहेत. गेल्यावर्षीपेक्षा उबदार कपड्यांच्या मागणीत वीस टक्क्यांनी वाढली आहे. भाव मात्र स्थिर आहेत.
  • किदवाई रोड, मोहम्मद अली रोड, सटाणा नाका, गिर णा पूल, अंजुमन चौक, आझादनगर यासह विविध भागात थंडीच्या कपड्यांची दुकाने नोव्हेंबरपासून सुरु झाली आहेत.
  • गरिबांचा गुरुवारचा बाजार हक्काचा झाला आहे. या बाजारात मुंबईहून जुन्या कपड्यात स्वेटर विक्रीसाठी येत आहेत.
  • जुन्या स्वेटरची हातगाड्यांवर पन्नास रुपयांना विक्री होत आहे. त्याचप्रमाणे शहरासह ग्रामीण भागात दुचा की व पिकअपमध्ये चादर, मफलर, शाल, स्वेटर विक्री करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
  • स्वेटर व चादरी विकण्यासाठी राजस्थानमधील व्यावसा यिक शहर व तालुक्यात दाखल झाले आहेत. गिरणा पुलावर वीस दुकाने आहेत. या दुकानांमध्ये वूलन स्वेटरची रेलचेल आहे.
  • किदवाई रस्त्यावर हंगामी स्वेटर विक्रीची दुकाने असून या दुकानात मालेगाव, मुंबई, कोलकोत्ता आदी भागा तील स्वेटर येत आहेत.
  • दुकानात दीडशेपासून ते तीनशे रुपयांपर्यंत स्वेटर विक्रीस आले आहेत. स्वेटरमध्ये कॉलर, हाफ बाह्यांचे, बेल्ट, लाँग, काश्‍मिरी, जॅकेट, झिफर या प्रकारचे स्वेटर आहेत.
  • लहान मुलांमध्ये वूलन, तर महिलांमध्ये कॉलरच्या स्वेट रची ‘क्रेझ’ आहे. किदवाई रस्त्यावर स्वेटर स्वस्तात मिळत असल्याने ‘कसमादे’ परिसरातील नागरिक गर्दी करीत आहेत.
  • त्याचबरोबर बाजारात टोपी, हातमोजे, सॉक्स, मफलर आदींची शेकडो दुकाने थाटली आहेत. टोपी मुंबई येथील चकला मार्केटमधून येत आहेत.
  • टोपीमध्ये फेदर, वूलन, कॉटन लाईकरा, फर कॅप यासह पंधरा प्रकार असून चाळीस ते नव्वद रुपयांपर्यंत टोपीची विक्री होत आहे.
  • लहान मुलांसाठी नवीन फॅन्सी हेडफोन आले आहेत. बालगोपाल हेडफोन व फॅन्सी टोपीच्या प्रेमात पडले आहेत.
  • हेडफोन चाळीस ते साठ रुपयांमध्ये विकत मिळतात. ज्येष्ठ नागरिक वूलन व कॉटनचे मफलर खरेदी करताना दिसत असल्याची माहिती मोहम्मद फैजान यांनी दिली.
  • नरकोळ : बहुतांश दुकानांमध्ये फॅशनच्या मफलर आणि मखमली उबदार खरेदीचा कल दिसून येत आहे. सिल्कचे स्टॉल्स मुलींचे केंद्रबिंदू आहेत.
  • कपड्यांशी ‘मॅचिंग’ होणाऱ्या उबदार कपड्यांना मागणी आहे. लोकरीच्या उबदार कपड्यांची चलती आहे. चिमु कल्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत विविध डिझाईनचे स्वेटर, जॅकेट बाजारात उपलब्ध आहेत.
  • उबदार कपड्यांचे भाव रुपयांमध्ये असे : जॅकेट-पाचशे ते बाराशे, लुझर-चारशे ते आठशे, स्वेटर-पाचशे ते नऊशे, मफलर-शंभर, कानटोपी-साठ ते एकशे वीस, हातमोजे-शंभर ते दोनशे, महिलांचे स्वेटर-चारशे ते बाराशे, ट्रॅकसूट-पाचशे, छोट्या बालकांचे स्वेटर-शंभर ते साडेचारशे.
  • “गेल्यावर्षी प्रमाणे स्वेटरचे भाव आहेत. स्पर्धेमुळे किद वाई रस्त्यावर दर्जेदार वस्तू कमी किमतीत विकाव्या लागतात.
  • त्यामुळे पाहिजे तसा नफा मिळत नाही. दिवसभरातून शेकडो स्वेटर विकले जातात. लहान मुलांच्या स्वेटरला अधिक मागणी आहे.”
  •  मोहम्मद हनीफ, स्वेटर विक्रेता (मालेगाव)
  • “थंडी वाढल्याने उबदार कपड्यांना मागणी वाढली आहे. दोन पैसे मिळतील या अपेक्षेने राजस्थानमधून आम्ही कपडे विक्रीसाठी येत असतो.”
  • रामजीभाई, उबदार कपडे विक्रेता (राजस्थान)
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा