
शासनाच्या ई-गव्हर्नन्स धोरणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी शासकीय ई-मेल वापर अनिवार्य करण्याची मागणी.
- प्रतिनिधी : अनंत पाटील :- ज्ञानमाता सेवाभावी संस्था संचलित माहिती अधिकार नागरी समूहाचे जिल्हाध्यक्ष श्री.दीपक पाचपुते यांनी आज जिल्हाधिकारी, मुख्य कार्य कारी अधिकारी, तहसीलदार, पोलीस अधीक्षक, गटविका स अधिकारी, नगरपालिका तसेच सर्व शासकीय कार्याल य प्रमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे स्पष्ट मागणी केली की, सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शासकीय कामकाजासाठी केवळ अधिकृत ई-मेल आयडीच (उदा. @maharashtra.gov.in) वापरावा, अशी सक्त कार्य वाही तातडीने करण्यात यावी.

- शासनाच्या ई-गव्हर्नन्स व डिजिटल इंडिया धोरणांतर्गत हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल असून, अद्याप अनेक कार्यालयां मध्ये खाजगी ई-मेल सेवा (Gmail, Yahoo इ.) चा वापर होत असल्यामुळे गोपनीयता, माहितीची सुरक्षा,RTI प्रक्रि येची पारदर्शकता व प्रशासकीय उत्तरदायित्व यावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे, असे श्री.पाचपुते यांनी सांगितले.
- या निवेदनात पुढील प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या आहेत:
- सर्व कर्मचाऱ्यांना अधिकृत ई-मेल आयडी त्वरीत वितरित करणे, सर्व पत्रव्यवहार, आदेश, RTI माहिती यासाठी फ क्त अधिकृत ई-मेलचा वापर सक्तीने लागू करणे पदनामा वर आधारित ई-मेल आयडी तयार करून अधिकाऱ्यांच्या बदल्यानंतरही पत्रव्यवहार चालू ठेवण्याची व्यवस्था
- यासंदर्भातील आदेश व परिपत्रके सर्व कार्यालयांना निर्गमित करणे
- शासनाच्या माहिती सुरक्षा, RTI पारदर्शकता,आणि डिजि टल प्रशासनाच्या दिशेने हे पाऊल अत्यंत गरजेचे असल्या चे मतही त्यांनी व्यक्त केले.
- नागरिकांच्या माहिती अधिकाराच्या अंमलबजावणीसाठी ही बाब अपरिहार्य असून, प्रशासनाने याकडे गांभीर्याने ल क्ष द्यावे, अशी नम्र मागणी त्यांनी केली.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











