
राजापूर तहसीलदार कार्यालयातील कोषागार सहाय्यक महसूल अधिकारी मंगेश परांजपे आदर्श महसूल कर्मचारी पुरस्कााने सन्मानित.
- प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :-शहरातील कै.सुधा सुधाकर जोशी यांचे स्मृती प्रित्यर्थ्य त्यांचे सुपुत्र मिलिंद जोशी, दिलीप जोशी व प्रशांत जोशी यांनी यावर्षीपासून काही ठराविक रक्कम राजापूर तालुका महसूल कर्मचारी संघटनेकडे सूपूर्द केली असून.

- त्या रक्कमेकवरील व्याजाची रक्कम दरवर्षी महसूल कर्म चारी यांना आदर्श महसूल कर्मचारी देण्याचा मनोदय व्यक्त केला होता.
- त्यानुसार सन २०२४-२५ करीता पहिल्या वर्षीचा पुरस्कार राजापूर तहसीलदार कार्यालयात कोषागार सहाय्यक मह सूल अधिकारी पदावर कार्यरत मंगेश परांजपे यांना एक आँगस्ट म्हणजेच महसूल दिनी राजापूर तालुका आदर्श महसूल कर्मचारी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

- सदर पुरस्कारा अंतर्गत रोख रक्कम व प्रशस्तिपत्र असे पुरस्कराचे स्वरुप आहे.
- श्री.परांजपे हे सन २००७ पासून महसूल प्रशासनात कार्य रत असून, यापूर्वी ते तहसीलदार कार्यालय, गुहागर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी येथे कार्यरत होते.
- सन २०१६ पासून ते तहसीलदार कार्यालय, राजापूर येथे सहाय्यक महसूल अधिकारी या पदावर कार्यरत आहेत.
- राजापूर तालुक्यात परांजपे हे प्रामाणिक व कार्यतत्पर तसेच महसूल प्रशासनाची उत्तम जाण असणारे कर्मचारी म्हणून ओळखले जातात.

- सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











