
कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई यांची बैठक यशस्वी संपन्न; बैठकी नंतर शासनाने काढलेल्या जीआर ची केली होळी.
- प्रतिनिधी : प्रमोद तरळ :-कुणबी समाजोन्नती संघ,मुंबई संलग्न प्रतिनिधी मंडळ, कार्यकारणी, कुणबी युवा मंडळ, कुणबी विवाह मंडळ, कुणबी महिला मंडळ, तालुका व वि भागीय शाखा, कुणबी जिल्हा समन्वय समिती, विविध कु णबी संघटना रविवार दि. ७ सप्टेंबर २०२५ सकाळी ११ वा. मुलुंड येथील कुणबी वसतिगृह प्रबोधन हॉल येथे, सं घाध्यक्ष मा. अनिलजी नवघणे यांच्या अध्यक्षतेखाली कुण बी समाजाची तातडीची बैठक अत्यंत उत्साहात व प्रचंड संख्येने उपस्थित असलेल्या बांधवांच्या साक्षीने यशस्वी रीत्या पार पडली.
- या बैठकीस सर्व शाखा, विभाग, विविध संघटना तसेच सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- या सभेत राजापूर तालुक्याच्या वतीने शाखा अध्यक्ष श्री शिवाजी तेरवणकर यांनी आपले मत मांडले आणि योग्य त्या सूचना केल्या त्याच प्रमाणे संघाचे माजी सचिव श्री अरविंद डाफळे यांनी आपले मत व्यक्त केले.
- तसेच राजापूर तालुक्यातून श्री.अशोकजी वालम,श्री रविं द्र बावकर, श्री.रविंद्र मटकर, ऍड श्री सुभाष बाने,श्री.संतो ष चौगुले , श्री मधुकर तोरस्कर यांनी विधायक सूचना मांडल्या.
- संघाच्या आदेशानुसार शाखेच्या वतीने आंदोलनाची तया री बाबत लवकरच समाज बांधवांची जाहीर बैठक आयो जित करून पुढील माहिती दिली जाईल.
- येत्या काळात मराठा समाजाकडून होणाऱ्या घुसखोरीला परतवून लावण्यासाठी मुंबई व कोकणातील कुणबी बांध व सज्ज राहतील.
- कुणबी समाजोन्नती संघ व इतर सर्व कुणबी संघटना एक त्र येऊन संयुक्त लढा देतील, समस्त कुणबी बांधवांनी सं घटित होऊन ओबीसींच्या हक्कांसाठी सक्षम लढा द्यायचा आहे.
- येणाऱ्या पिढ्यांचे अस्तित्व व ओळख टिकवण्यासाठी स र्वांनी संघाच्या मार्गदर्शनाखाली आक्रमक आंदोलनात स क्रिय सहभाग नोंदवावा, OBC मध्ये घुसखोरीला प्रखर विरोध – सरसकट कुणबी दाखले देणे बंद करावे.
- हैदराबाद गॅजेट्सप्रमाणे जो GR काढला आहे त्याला कु णबी समाजाचा तीव्र विरोध आहे.
- सदर बैठकीला राजापूर तालुक्यातील समाज बांधव बहु संख्येने सहभागी होऊन सभा यशस्वी केल्याबद्दल सर्व समाज बांधवांचे आभार मानण्यात आले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











