
अजित फाऊंडेशन बार्शी तर्फे ‘आपला आधार’ वृद्धाश्रमाला किराणा साहित्याचे वाटप.
- प्रतिनिधी : परंडा : फारूख शेख :- दि16 जुलै 2025 समाजातील निराधार वयोवृद्ध नागरिकांसाठी सामाजिक बांधिलकीतून अजित फाऊंडेशनने एक विधायक उपक्रम राबवला.
- या उपक्रमांतर्गत, ब्रम्हगाव (ता. परंडा) येथील ‘आपला आधार’ वृद्धाश्रमात 500 किलो किराणा साहित्य व आव श्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

- या वाटपामध्ये तूरडाळ, मसूरदाळ, हरभरा, तांदूळ, ज्वारी, राजमा, मूग, गरा, साखर आणि उबदार ब्लँकेट्स यांचा समावेश होता.
- वृद्धाश्रमातील गरजू ज्येष्ठ नागरिकांच्या दैनंदिन गरजा ल क्षात घेऊन ही मदत करण्यात आली. या उपक्रमात अजि त फाऊंडेशनचे कार्यकर्ते व स्वयंसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
- वृद्धाश्रमातील आजी-आजोबांच्या चेहऱ्यावरचे आनंदाचे हास्य ही या सेवाभावी कार्याची खरी पावती ठरली.
- ‘आपला आधार’ वृद्धाश्रमाचे अध्यक्ष झुल्फिकार काझी यांनी सांगितले,“आमच्या संस्थेत राहणाऱ्या निराधार वृद्धां ची सेवा करण्याचा आमचा प्रयत्न असून, ग्रामीण भागात अशा सेवा सुरू ठेवण्यासाठी समाजाची साथ महत्त्वाची आहे.
- अजित फाऊंडेशनने केलेली मदत आम्हाला खूप मोठा आधार ठरली. समाजातील प्रत्येकाने अशा कार्यात सहभा गी व्हावे, हीच अपेक्षा.”
- यावेळी आधार संस्थेचे तौफिक मशायक, सोहेल काझी व वृद्धाश्रमातील नागरिक उपस्थित होते.

- अजित फाऊंडेशनने आधार वृद्धाश्रमाला आधार देऊन खर्या अर्थाने आधार देऊन वृद्धसेवेचे पाऊल उचलले आ हे. समाजातील अशा घटकांना कुटूंबाचा आधार समजून ही मदत केली आहे.
- महेश निंबाळकर, अध्यक्ष – अजित फाऊंडेशन.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











