खासदार रविंद्र वायकर यांच्या हस्ते श्याम नगर तलाव येथील ५० फुट उंच ध्वज स्तंभावर ध्वजारोहण.

  • प्रतिनिधी : उदय वाघवणकर :-भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील खासदारांना केलेल्या आवाहनानुसार भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत श्याम नगर तलाव येथे उभारण्यात आलेल्या ५० फूट उंच ध्वज स्तंभावर मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार र वींद्र वायकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
  • १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचा उत्सव मोठ्या उत्साहात सा जरा करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशा तील सर्व खासदारांना केले होते.
  • याचे औचित्य साधत खासदार रवींद्र वायकर यांच्या संक ल्पनेतून श्यामननगर तलाव येथे ५० फूट उंच ध्वजस्तंभ उभारण्यात आला.
  • जोगेश्वरी (पूर्व) येथील मिनी चौपाटी अशी लोकमान्य टि ळक सर्वांजनीक विसर्जन तलाव व परिसराची ओळख आहे.
  • या तलावावर जोगेश्वरी, गोरेगाव व अंधेरी येथील जनता मोठ्या प्रमाणात फेरफटका मारण्यासाठी येतात.
  • त्यामुळे संपूर्ण देशवासीयांचा अभिमान असलेला तसेच धै र्य आणि त्यागाचे प्रतीक असलेला भगवा रंग, शांतता तसे च सत्याचा पांढरा रंग, समृद्धी आणि सुपीकता दर्शवणारा हिरवा रंग त्याचबरोबर गती आणि प्रगतीचे प्रतिनिधित्व करणारे अशोक चक्र असे प्रतीक असलेल्या भव्य असा राष्ट्रध्वज फडकवण्यात आला आहे.
  • १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता पार पडलेल्या ध्वजा रोहण समारंभासाठी सहाय्यक पोलीस आयुक्त संपत पाटील, मेघवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हुंबे, इस्माईल युसूफ महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. स्वाती व्हावळ, के – पूर्वचे सहाय्यक आयुक्त मिश्रा, पी – उत्तरचे सहाय्यक आयुक्त वळवी, मनीषा वायकर, माजी नगर सेवक राजू पेडणेकर, संजय पवार, रेखा रामवंशी, विभाग प्रमुख अल्ताफ पेवेकर, गणेश शिंदे , प्रियांका आंबोळकर, रचना सावंत, ज्ञानेश्वर सावंत, डॉ.राहुल महाले, डॉ.अमेय पोतनीस, मिलिंद कापडी, पूजा शिंदे, विविध महाविद्याल यातील एनएसएस व एनसीसीचे विद्यार्थी, शाखाप्रमुख, महिला पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles