
शेतात विज पडून शेतकरी गंभीर जखमी.
- प्रतिनिधी : अकोला बाजार :- अकोला बाजार परिसरा त शुक्रवारी सायंकाळी विजेच्या कडकडाटासह झालेल्या जोरदार पावसात बारड तांडा शिवारात विज पडून युवा शेतकरी गंभीर जखमी झाला.
- जखमी शेतकऱ्याचे नाव मारोती मोहन राठोड (35, रा.बा रड तांडा) असे आहे. मारोती राठोड हा मक्त्याने केलेल्या शेतात गेला होता.

- पावसामुळे तो अन्य चार शेतकऱ्यांसह शेतातील झोपडी त थांबला होता. पाऊस कमी झाल्यानंतर घरी जाण्यासा ठी झोपडीतून बाहेर पडताच अचानक जोरदार विज कोसळली.
- या घटनेत मारोती गंभीर जखमी झाला असून त्याच्या ना कातून रक्तस्त्राव झाला. तो बेशुद्ध अवस्थेत खाली कोसळला.

- घटनेची माहिती मिळताच सरपंच अनिल आडे, तसेच जि तेंद्र जाधव, अरुण राठोड आणि विलास जाधव यांनी तत्काळ धाव घेत जखमी शेतकऱ्याला यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











