
मॉडर्न शैक्षणिक संकुलात स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न.
- प्रतिनिधी : शिवाजी अंबिके :-प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सो सायटीच्या मॉडर्न हायस्कुल निगडी येथे ७९ वा स्वातंत्र्यदि न मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
- यावेळी प्रमुख पाहुणे निगडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोली स निरीक्षक महेश बनसोडे, सी.ए.शेखर साने उपस्थित होते.

- व्यासपीठावर मॉडर्न शैक्षणिक संकुलातील शाखाप्रमुख प्राचार्य डॉ.प्रवीण चौधरी, प्रा.अतुल फाटक,प्राचार्य डॉ.म नोज साठे,डायरेक्टर डॉ.मैथिली अर्जुनवाडकर,संस्था सद स्य राजीव कुटे,प्राचार्या शारदा साबळे,इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका गौरी सावंत,प्राथमिक इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका तृप्ती वंजारे,प्राथमिक मराठी माध्यमाचे मुख्याध्यापक पांडुरंग मराडे,शिशुगट मुख्याध्यापिका संगी ता घुले, विजय पाचारणे, अनिल अढी,प्रशांत मरकळे उप स्थित होते.

- यावेळी महेश बनसोडे म्हणाले, ज्या क्रांतिकारकांनी, देश भक्तांनी देशासाठी आपले बलिदान दिले त्यांचे स्मरण ठेवले पाहिजे.
- हे सांगताना आर.एस.पी. आणि स्काऊट गाईडचे संचलन पाहून शालेय जीवनातील आठवणी ताज्या झाल्याचे सांगितले.

- लहानपणीचे स्वछंदी जीवन वाढत्या वयात,वाढत्या जबाबदाऱ्यामुळे हरवत जाते,म्हणून बालपण जपा असा सल्ला त्यांनी दिला.
- यावेळी प्रमुख पाहुणे चार्टर्ड अकाउंटट शेखर साने यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत देशासाठी का हीतरी करण्याचा संकल्प करा असे सांगितले. पाहुण्यांच्या हस्ते नियतकालिकाचे प्रकाशन करण्यात आले.

- यावेळी शिशुगटाच्या लहान मुलांनी संत ज्ञानेश्वर महाराजां च्या जीवनावर आधारित नाटीका सादर करून उपस्थितां ची मने जिंकली.
- संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.गजानन एकबोटे,संस्थेचे कार्यवा ह प्रा.शामकांत देशमुख, सहकार्यवाह प्रा.डॉ.ज्योत्स्ना एक बोटे यांनीही शुभेच्छा दिल्या.

- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











