
मॉडर्नमध्ये बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी.
- प्रतिनिधी : पुणे : नामदेव मेहेर :- यमुनानगर निगडी ये थील मॉडर्न हायस्कुलमध्ये बिरसा मुंडा जयंती विविध उप क्रमांनी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाची सुरुवात बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूज न करून झाली.
- यावेळी बिरसा मुंडा यांच्या कार्याची माहिती वैशाली देश पांडे यांनी दिली. यावेळी बिरसा मुंडा यांच्या जीवनावर आधारीत चित्रकला,निबंध स्पर्धा घेण्यात आल्या.

- तर महिला पालकांनी पारंपारिक आदिवासी खाद्य पदार्थां च्या प्रदर्शनात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.यावेळी मुलींच्या आदिवासी गीतावरील नृत्यास प्रेक्षकांनी दाद दिली.
- कार्यक्रमाचे नियोजन जयश्री चव्हाण व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य अभिषेक संकपाळ यांनी केले. आदिवासी नृत्यासाठी अमृता गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.
- आदिवासी खाद्य पदार्थांच्या प्रदर्शनाचे नियोजन साधना राऊत यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका शारदा साबळे यांनी तर सुत्रसंचलन प्रणव पिसाळ यांनी केले.
- या कार्यक्रमासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे मॉ डर्न कॉलेज ऑफ फार्मसीचे अध्यक्ष साहिल गाजरे तर सहमंत्री शैलेश मराठे उपस्थित होते.

- उपक्रमाचे कौतुक संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.गजानन एक बोटे, कार्यवाह प्रा.डॉ.शामकांत देशमुख,सहकार्यवाह प्रा. डॉ.ज्योत्स्ना एकबोटे,उपकार्यवाह प्रा.डॉ.निवेदिता एकबो टे, शाळा समिती अध्यक्ष प्रा.मानसिंग साळुंके,व्हिजिटर प्रमोद शिंदे,राजीव कुटे,पर्यवेक्षक विजय पाचारणे यांनी केले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











