राज्यात प्रती लिटर पाच रुपये अनुदानासाठी २३० कोटी रुपयांची आर्थिक तरतूद
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
- प्रतीनीधी : भारत साळुंके :- ‘राज्य शासन निर्णया नु सार ता. ५ जानेवारी रोजी राज्यातील सहकारी संघ व खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पा दक शेतकऱ्यांना दूधासाठी प्रतिलिटर पाच रुपये अनुदान योजना जाहीर केली आहे.
- सदर योजना अंमलबजावणी कालावधी गुरुवार (ता. ११ जानेवारी) ते शनिवार (ता. १० फेब्रुवारी) पर्यंत आहे. राज्यात २३० कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे.
- पुणे विभागात एकूण ८३ दुध प्रकल्प अनुदानासाठी पा त्र आहेत.’ अशी माहिती पुणे विभागाचे प्रादेशिक दुग्ध विकास अधिकारी पी.पी मोहोड यांनी दिली.
- ते म्हणाले ‘पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व सहकार या विभागामार्फत संयुक्तरित्या सदर योजनेची अमलबजा वणी केली जात आहे.
- योजना प्रभाविपणे राबविण्यासाठी शासन निर्णयातील तरतुदीस अनुसरून प्राप्त अर्जाची छाननी करुन जिल्हा निहाय सहकारी/खाजगी प्रकल्पांना माहिती भरण्या करीता लॉगीन आयडी व युजर आयडी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. प्रक्रिया सुरु आहे.’
- ‘पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाच्या वतीने प्रादेशिक जिल्हा स्तरावर प्रकल्पांच्या संयुक्त बैठका घेऊन योजनेच्या अंमलबजावणी विषयी वेळोवेळी माहिती देण्यांत आली आहे.
- पशुसंवर्धन विभागाच्या वतीने दूध उत्पादक शेतकऱ्यां च्या जनावरांना ईअरटॅग करणे, तसेच आवश्यक माहि ती भरण्याची कार्यवाही मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे.
- अनुदान योजनेपासून एकही दूध उत्पादक शेतकरी वंचित राहू नये याकरीता सर्व दूध उत्पादक शेतक-यांनी E-Gopala, 1962 NDLM या Application मध्ये Farmer ID आयडी तयार करून घ्यावा.
- ईअरटॅगींग साठी जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाशी सं पर्क साधून आपल्या जनावरांचे ईअरटॅग करुन घ्यावे. असे आवाहन पशु संवर्धन खात्याच्या वतीने करण्यात आले आहे.
- सहकारी संघ, मल्टीस्टेट, खाजगी प्रकल्प संख्या पुढी ल प्रमाणे :- पुणे 23, सातारा 25, सांगली 12, सोला पूर 14, कोल्हापूर 9, एकूण ८३. ‘राज्यात एकूण दररो ज एक कोटी ४५ लाख २१ हजार लिटर दुध उत्पादन होते.
- त्यामध्ये दुध उत्पादक शेतकरी ४१ लाख ९७ हजार लिटर दुध सहकारी संघाना व उर्वरित एक कोटी तीन लाख २४ हजार लिटर दुध खासगी प्रकल्पांना पुरवठा करतात.
- राज्य शासनाच्या निर्णयामुळे खासगी व सहकारी दुध प्रकल्पांना दुध पुरविणारया दुध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाचा फायदा होणार आहे.’
- पी.पी.मोहोड, प्रादेशिक दुग्ध विकास अधिकारी, पुणे विभाग
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space