नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , ज्ञानवापी प्रकरणात कोर्टाचा मोठा निर्णय; मशिदीच्या तळघरात पूजा करण्याची मिळाली परवानगी. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

ज्ञानवापी प्रकरणात कोर्टाचा मोठा निर्णय; मशिदीच्या तळघरात पूजा करण्याची मिळाली परवानगी.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : हिराजी देसले :- ज्ञानवापी मशिदीसंदर्भात मोठी माहिती समोर येत आहे. मशिदीच्या तळघरात पूजा करण्यासाठी वाराणसी कोर्टाने परवानगी दिली आहे.
  • त्यामुळे हिंदू पक्षकारांना दिलासा मिळाला आहे. ज्ञान वापी परिसरातील ‘व्यास का तैखाना’ येथे हिंदूंना आरती-पूजा करता येणार आहे.
  • वाराणसी कोर्टाने यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला सूचना केल्या असून येत्या सात दिवसात यासंदर्भात आवश्य क व्यवस्था करुन देण्याचे आदेश दिले आहेत.
  • यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना हिंदू पक्षकारांचे वकी ल विष्णु शंकर जैन म्हणाले की, हिंदू पक्षकाराला ‘व्यास का तैखाना’ येथे पूजा करण्याची परवानगी मिळाली आहे.
  • जिल्हा प्रशासनाला यासंदर्भात सात दिवसांत व्यवस्था करुन द्यावी लागेल. त्यामुळे आता सर्वांना पूजा करण्याचा अधिकार मिळेल.
  • मागील आठवड्यात कोर्टाच्या आदेशानुसार ‘व्यास का तैखाना’ ची चावी डीएमनी आपल्या ताब्यात घेतली होती. हिंदू पक्षाचे वकील आजची घटना राम मंदिराचे दरवाजे खुले करण्याच्या घटनेसारखी मानत आहेत.
  • या तळघरात १९९३ पूर्वी पूजा व्हायची असं सांगितलं जातं. अयोध्येतील बाबरी पाडल्यानंतर ज्ञानवापीच्या चारी बाजूंना प्रशासनाने लोखंडाचे बॅरिकेंडिग लावले होते. त्यामुळे या तळघरात जाणे शक्य नव्हते.
  • माहितीनुसार, सोमनाथ व्यास यांचा परिवार १९९३ पूर्वी तळघरात नियमित पूजा करायचा. पूजा पुन्हा सुरु व्हा वी यासाठी व्यास यांचे नातू शैलेंद्र व्यास यांनी कोर्टात धाव घेतली होती.
  • त्यांनी याचिकेमध्ये म्हटलं होतं की, १९९३ पासून तळ घरात पूजा बंद झाली आहे. सध्या हे तळघर अंजुमन इंतजामिया मसाजिद कमिटीकडे आहे.
  • आता या तळघरात पुन्हा पूजा सुरु होईल. कोर्टाने १७ जानेवारीला तळघराची चावी आपल्या ताब्यात घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा