नागेश्वर शिक्षण प्रसारक मुबंई मंडळाच्या अध्यक्षपदी श्री.सुधाकर महादेव उतेकर यांची निवड.

  • प्रतिनिधी : खेड : प्रमोद तरळ :- तालुक्यातील चोरवणे सारख्या दुर्गम भागात नागेश्वर शिक्षण प्रसारक मुबंई मंड ळाने १९८५ साली शारदा विहार माध्यमिक विद्यालय चोर वणे या विद्यालयाची स्थापना केली.
  • विद्यालयाची स्थापना झाल्यापासून चोरवणे, निवे,सापीर्ली तसेच इतर काही गावातील विद्यार्थी विद्यालयात शिक्षण घेत आहेत.
  • या विद्यालयातुन असंख्य विद्यार्थी शिक्षण घेऊन उच्चपदा पर्यंत पोचले आहेत. शारदा विहार माध्यमिक विद्यालय गे ली अनेक वर्ष १००% निकाल लावत आहे.
  • यामध्ये संस्था,शिक्षक, विद्यार्थी यांची प्रचंड मेहनत आहे. नागेश्वर शिक्षण प्रसारक मुबंई मंडळाने सैनिकी पॅटर्नच्या धर्तीवर सैनिकि वसतिगृह स्कुल ची निर्मिती केली आहे.
  • त्यामुळे विद्यालयात अनेक भागातून विद्यार्थी प्रवेश घेत आहेत. दि. १७/८/२०२५ रोजी नागेश्वर शिक्षण प्रसारक मुबंई मंडळाची सर्व साधारण सभा मुबंईमध्ये पार पडली.
  • या सभेमध्ये मंडळाच्या कार्यकारिणी मध्ये बद्दल करण्यात आला.मंडळाच्या अध्यक्षपदी श्री.सुधाकर महादेव उतेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
  • श्री सुधाकर महादेव उतेकर हे डिसेंबर १९८५ ते ऑगस्ट २०२१ पर्यत शासन सेवा मंत्रालयात लघुलेखक म्हणून अनेक विभागात कार्यरत होते.
  • १९९० पासुन शिक्षण संस्थेत विविध पदावर त्यांनी काम केले आहे.गेली काही वर्षे विद्यालयासाठी खूप मेहनत घेत आहेत.
  • वडिलोपार्जित निस्वार्थी समाजसेवेचा वारसा,कौटुंबिक आर्थिक स्थिती बेताची असुनही शिक्षणसह वडिलांच्या समाजकार्यात सहभागी होते.
  • नोकरीत स्थिरावल्यानंतर आर्थिक स्थितीत सुधारणा होत असतानाच स्वतंत्रपणे अनेक शैक्षणिक व सामाजिक संस्थांचे संपर्कात आल्याने समाजकार्य वेगाने सुरू झाले.
  • गड किल्ले पर्वत भ्रमंती ची आवड,
  • वारकरी संप्रदायाच्या सहवासाने भक्तीची जोड आणि ओढ आहे.श्री विघ्नहर्ता प्रतिष्ठान मुबंई या संस्थेकडून २०२५ चा “समाजसेवा पुरस्कार” त्यांना प्राप्त झाला आहे.
  • सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय असे कार्य करत असताना नागेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ मुबंई या मंडळाच्या अध्य क्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांची अनेक विभागातून,संस्था , मंडळे, हितचिंतक यांच्या कडून अभिनंदन केले जात आ हे आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles