नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , पेटीएम ॲपचे काय होणार…? बंद होणार का..? RBIच्या कारवाईनंतर तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

पेटीएम ॲपचे काय होणार…? बंद होणार का..? RBIच्या कारवाईनंतर तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : नितीन राने :- पेटीएम पेमेंट बँकेवर कार वाई करत रिझर्व्ह बँकेने ऑनलाइन पेमेंट ॲप पेटीएम ला मोठा धक्का दिला आहे.
  • त्यानंतर पेटीएम पेमेंट बँकेच्या अनेक सेवांवर बंदी घालण्यात आली आहे. RBI ने 29 फेब्रुवारीनंतर टॉप अप ते क्रेडिट ट्रान्झॅक्शनपर्यंत अनेक सेवा बंद करण्या चे आदेश दिले आहेत.
  • आरबीआयच्या या कारवाईनंतर लोकांच्या मनात अनेक प्रश्न आणि संभ्रम आहेत. पेटीएम बंद होणार का..? पेटीएमच्या फास्टॅगचे काय होणार? वॉलेटमध्ये ठेवलेले पैसे कसे वापरणार? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या.
  • पेटीएम पेमेंट्स बँकेवर कारवाई का करण्यात आली…?
  • पेटीएम पेमेंट्स बँकेने रिझर्व्ह बँकेच्या नियमांकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर पेटीएम विरोधात कठोर निर्णय घेण्यात आला.
  • पेटीएम बंद होणार का..?
  • आरबीआयची ही कारवाई पेटीएम ॲपवर नाही तर पेटीएम पेमेंट बँकेवर केली आहे.
  • म्हणजेच, जर तुम्ही पेटीएम ॲप वापरत असाल आणि पेटीएम पेमेंट बँकेकडून सेवा घेत नसाल तर ॲपवर कोणताही फरक पडणार नाही.
  • 29 फेब्रुवारीनंतरही तुमचे पेटीएम ॲप पूर्वीप्रमाणेच काम करत राहील.
  • पेटीएम वॉलेट बॅलन्सचे काय होईल?
  • 29 फेब्रुवारीनंतर,तुम्हाला पेटीएम पेमेंट बँकेच्या वॉलेट मधील शिल्लक रकमेसाठी समस्या येऊ शकतात. म्हणून, मर्यादेपूर्वी वॉलेटमधील पैसे काढून घ्या किंवा हस्तांतरित करा.
  • पेटीएम यूपीआय पेमेंट थांबेल का?
  • आरबीआयने पेटीएम पेमेंट बँकेवर कारवाई केली आहे. याच्याशी संबंधित सेवांवर परिणाम होणार आहे.
  • 29 फेब्रुवारीनंतर तुम्ही पेटीएम पेमेंट बँकेतून UPI ​​वापरू शकणार नाही. पण तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही पेमेंटसाठी इतर बँकांचा UPI आयडी वापरू शकता.
  • नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड चालेल की बंद होईल?
  • आरबीआयच्या कारवाईनंतर पेटीएमने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर माहिती दिली की या कारवाईचा NC MC कार्डवर कोणताही परिणाम होणार नाही.
  • तुम्ही नंतरही कार्डमधील राहिलेले पैसे वापरु शकता. पेमेंट सुविधा चांगली करण्यासाठी पेटीएम इतर बँकां शी करार करत आहे.
  • पेटीएमच्या फास्टॅगचे काय होणार?
  • पेटीएम फास्टॅग 29 फेब्रुवारीपर्यंत वापरता येईल. यानं तर ते निष्क्रिय होईल. फास्टॅग सेवा सुरू ठेवण्यासाठी पेटीएम इतर बँकांसोबत काम करत आहे.
  • बँकांशी करार करता आला नाही, तर आणखी एक नवीन फास्टॅग खरेदी करावा लागेल.
  • कर्ज घेणाऱ्यांचे काय होणार…?
  • जर तुम्ही पेटीएम पेमेंट बँकेकडून कर्ज घेतले असेल, तर कर्जाची परतफेड पूर्वीसारखीच राहील. यासाठी पूर्वीप्रमाणेच हप्ते भरले जातील.
  • पेटीएम आता काय करणार?
  • पेटीएमची प्रवर्तक कंपनी One97 कम्युनिकेशन इतर बँकांसोबतही काम करत आहे. पेटीएम पेमेंट बँकेवरील कारवाईनंतर त्यांनी इतर बँकांसोबत बोलणी सुरु केली आहे. कंपनी पूर्वीप्रमाणेच थर्ड पार्टी बँकांसोबत काम करेल.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा