3 जिल्ह्यांच्या भाजप पदाधिकाऱ्यांत जुंपली: स्थानिक पदाधिकाऱ्यांची संघटनमंत्र्यांकडे तक्रार.
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
- प्रतीनीधी : संदीप कारके :- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची छत्रपती संभाजीनगर येथे होणारी सभा रद्द झाली. मात्र, सभेच्या संयोजना वरून भारतीय जनता पक्षात महाभारत घडले आहे.
- सभा तीन जिल्ह्यांच्या क्लस्टरची असताना केवळ छत्र पती संभाजीनगरातील स्थानिक पदाधिकारी चमकोगि री करत असल्याबद्दल इतर जिल्ह्यांच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला.
- त्यामुळेभाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला. केंद्रीय गृहमंत्री शाह यांची १५ फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजीनगरात सभा होणार होती.
- दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्व भूमीवर शहा यांची सभा रद्द केल्याचे सांगितले जाते. संभाजीनगर, नगर व जालना जिल्ह्यातील ४ लोकसभा मतदारसंघांसाठी ही सभा होती.
- असे असताना इतर जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष, प्रदेश पदा धिकारी, आमदार, खासदार, मंत्री आदींना विचारात न घेता स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आपलेच घोडे दामटले, अशी अन्य जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्याची तक्रार आहे.
- प्रदेश पदाधिकाऱ्यांशी शाब्दिक चकमक
- गर्दी जमवायला आम्ही आणि प्रदर्शन करायला तुम्ही, अशा शब्दांत जिल्हाध्यक्षांनी भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना सुनावले.
- स्थानिक पदाधिकाऱ्यांची अनेक प्रदेश पदाधिकाऱ्यां सोबत ‘तू तू मैं मैं’ झाली.
- भाजपचे छत्रपती संभाजीनगर उत्तरचे अध्यक्ष सुहास शिरसाठ, दक्षिणचे अध्यक्ष संजय खंबायते, जालन्याचे आणि नगरचे जिल्हाध्यक्ष यांना विचारात घेतले नसल्या ने त्यांनी संघटनमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केल्याचे खात्री लायक सूत्रांनी सांगितले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space