
श्रमदानातून अकोला बाजार–मंगरूळ मार्गावरील झाडे-झुडपांची काटछाट, अपघातांना आळा.
- प्रतिनिधी : सचिन कोयरे :- जय हिंद लोकचळवळ या सामाजिक संघटनेच्या पुढाकाराने अकोला बाजार ते मंग रूळ मार्गावरील वळणांवर अपघातास कारणीभूत ठरणा री वाढलेली झाडे-झुडपे व गाजर गवतांची काटछाट कर ण्यात आली.

- या श्रमदानामुळे रस्ता मोकळा झाला असून प्रवाशांना सुर क्षितपणे मार्गक्रमण करता येणार आहे.

- सदर मार्ग हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्या रीत असून, दुतर्फा वाढलेल्या झाडांची काटछाट करणे हे विभागाचे काम असताना मेंटेनन्ससाठी निधी उपलब्ध ना ही,असे कारण देत विभागाने हात झटकले.

- त्यामुळे जय हिंद लोकचळवळ संघटनेच्या युवकांनी एक त्र येत श्रमदानातून काटछाट केली.

- या उपक्रमामुळे रस्त्यावर वाढलेल्या झाडांमुळे वळणांवर निर्माण होणारा अडथळा दूर झाला असून, संभाव्य अप घात टळले आहेत.

- त्यामुळे ये-जा करणाऱ्या प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

- या श्रमदान उपक्रमात वैभव काळे, दुर्गेश भिवणकर, विठ्ठ ल मेश्राम,अविनाश रेवडे, प्रवीण भोंबे, अजय गेडाम, विनो द भिवणकर, गजानन मेश्राम, अक्षय जोगे, आकाश जोगे, आकाश भिवणकर, शरद भोंबे, अंकुश भराडे, अंश मेश्राम आदी युवकांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/










