बीड जिल्ह्यातील दोन बंधारे फुटल्यामुळे करमाळ्यातील सीना नदीला महापूर.

  • प्रतिनिधी : करमाळा : मुजंम्मील पटेल :-बीड जिल्ह्या तील कडा आष्टी भागातील दोन बंधारे अतिवृष्टीच्या पा ण्याने फुटल्याने सीना नदीला महापूर येऊन करमाळा ता लुक्यातील संगोबा, निलज, पोटेगाव, बाळेवाडी, तरटगाव, बंधारे पाण्याखाली गेल्याने नदीपात्रा कडील दहा गावात पाणी शिरल्याने हजारो ग्रामस्थांचा संपर्क तुटला,व जनजी वन विस्कळीत झाले आहे. तर परिसरातील शेतात पाणी साठल्याने उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे.
  • करमाळा तालुक्यातील सीना नदीला पूर आल्याने खडकी आळजापूर बिटरगाव तरटगाव पोटेगाव निलज या गावात पाणी शिरल्याने हजारो नागरिकांचा संपर्क तुटला व नाग रिकांचे प्रचंड हाल झाले.
  • मागील 25 वर्षात पहिल्यांदाच सीना नदीचे रौद्ररूप पाहा यला मिळाले सीना नदीवरील सर्वात उंच असलेल्या संगो बा बंधारा पूर्णपणे पाण्याखाली गेला या रस्त्यावरील वाह तूक पूर्णपणे बंद झाली.
  • हा बंधारा सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यास जोडणारा असल्याने दोन्ही जिल्ह्यांचा संपर्क तुटला 1984 व 1990 यावेळी अशा पद्धतीने सीना नदीला महापूर आला होता त्यानंतर पहिल्यांदाच इतके पाणी आले असल्याची माहिती आहे.
  • महापुरामुळे खडकी येथील खरात वस्ती सुरू वस्ती पूर्णप णे पाण्यात गेली असून शेतातील उभ्या पिकाचे मोठे नुक सान झाले आहे.
  • सीना नदीतील पाण्याच्या जोरावर जोरदार प्रवाहामुळे ख डकी येथील बंधारा फुटला असून तरडगाव पोटेगाव बंधा ऱ्याच्या बाजूचा भरावाचा भाग वाहून गेल्याने शेतामध्ये पाणी शिरले.
  • निलसगाव पूर्णपणे पाण्याखाली असून रात्री या गावातील तरुणांनी संपूर्ण गावातील लोकांना गावाबा हेर काढण्या साठी मदत केली.
  • सोमवार सायंकाळी सहा वाजल्यापासून सीना नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होण्यास सुरुवात झाली.
  • दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी सात वाजल्यापासून पाणी पातळी वाढ होत असल्याचे दिसून आले.
  • सोमवारी रात्री तहसीलदार शिल्पा ठोकडे पोलीस निरीक्ष क रंजीत माने यांनी संगोबा येथे भेट देऊन नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या.
  • सीना नदीच्या पुराचे पाणी निलज संगोबा गावात शिरल्या ने निलज येथून सत्तर लोक महामुनी मंगल कार्यालयात स्थलांतरित करण्यात आले.
  • तर निलेश येथून 25 लोक आनंदी लॉन्स मध्ये ठेवण्यात आले शिवाय आवटी येथून आठ ते दहा लोक तात्पुरते स्थलांतरित आलेले आहेत.
  • खडकी यातून गावातच सुरक्षित ठिकाणी वीस ते पंचवीस लोक सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलेले आहेत अशी माहिती तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी दिली.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles