
राजे शिवाजी पब्लिक स्कूल परांडा व बावची विद्यालय येथे ‘विद्यार्थी प्रवेशोत्सव’ उत्साहात साजरा.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- राजे शिवाजी पब्लि क स्कूल परांडा व बावची विद्यालय, परंडा येथे ‘विद्यार्थी प्रवेशोत्सव’ मोठ्या आनंदात आणि प्रेरणादायी वातावर णात संपन्न झाला.
- शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांचा उत्साह, पालकांची उपस्थि ती आणि मान्यवरांचा सन्मानपूर्ण साक्षात्कार यामुळे कार्य क्रम अधिकच वैशिष्ट्यपूर्ण ठरला.
- इयत्ता पहिली मधील नवीन प्रवेशित विद्यार्थी व शाळेत प्र वेशित असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.

- यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. पालकांमध्ये आपला मुलगा शाळेत जात आहे याचे एक समाधान पालकांच्या चेहऱ्यावर दिसत होते.
- या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बिभिष ण रोडगे सर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री.बाबा सा हेब खरात (पोलीस उप निरीक्षक) यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शिस्त आणि शिक्षणाचे महत्व सांगितले.
- तसेच शिक्षण हे केवळ अभ्यासापुरते मर्यादित नसून ते व्यक्तिमत्त्व विकासाचे माध्यम आहे. शाळा हे विद्यार्थ्यां च्या उज्ज्वल भविष्यासाठी पायाभूत स्थान आहे,” असे मत मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले.
- त्यांच्या समवेत रशीद सय्यद व सुशीलकुमार कोळेकर (दोघेही पोलीस अंमलदार) तसेच कार्यक्रमाला बालाजी नेटके, औदुंबर गाडे आणि शहाजी अप्पा पाटील डोंजेकर (माजी जिल्हा परिषद सदस्य) हे मान्यवरही उपस्थित होते.
- शाळेचे प्राचार्य नारायण खैरे यांनी उपस्थितांचे स्वागत क रून नव्या वर्षात शाळेच्या शिक्षणात्मक आणि उपक्रम शील योजना पालकांसमोर मांडल्या.
- नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे औपचारिक स्वागत मान्यवरां च्या उपस्थितीत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/










