
वडगाव पोलीस स्टेशन हद्दीत प्रथमच डीजे मुक्त गणेश विसर्जन; आदेशाचे उल्लंघन करणार्यांवर पोलिसांची कारवाई,परिसरातील डीजे चालकांमध्ये धास्ती.
- प्रतिनिधी : अकोला बाजार :- मा.उच्च न्यायालयाचे ध्व नीप्रदूषणाबाबतचे आदेश व जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी जारी केलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन तसेच यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या डिजे मुक्त विसर्जन आवाहनाला डावलुन गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेचा वापर झाल्याप्रकरणी वडगाव पोली स स्टेशनच्या पथकाने कारवाई करून दोन डीजे संच ज प्त केले.
- या प्रकरणी आकपुरी व लोणी घाटाना येथील गणेश मंड ळावर व डिजे चालक यांच्यावर गुन्हा दाखल करून तपा स सुरू आहे.

- दि. 6 सप्टेंबर रोजी ठाणेदार विकास दांडे हे पोलिस ना ईक रुपेश डोंगरे, पोलीस कॉन्स्टेबल पुकार वाकोडे, पोली स शिपाई पूनम लोड व इतर कर्मचारी यांच्यासह बंदोब स्तावर असताना मिरवणुकीत डीजेचा वापर होत असल्या ची माहिती मिळाली.
- तत्काळ घटनास्थळी जाऊन पंचांच्या उपस्थितीत तपास णी करण्यात आली असता, डीजेचा आवाज शासनाने नि श्चित केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त म्हणजेच 102.2 डेसिब ल इतका असल्याचे ध्वनीमापक यंत्राद्वारे स्पष्ट झाले.
- पोलिसांनी तत्काळ कारवाई करत ध्वनीक्षेपक, साउंड बॉ क्स व संबंधित वाहन जप्त केले असून स्वतंत्र पंचनामा तयार करण्यात आला आहे.
- याप्रकरणी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1)(3), शिक्षा कलम 135 तसेच भारतीय न्याय संहिता कलम 223 अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











