नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , सटाणा येथील शंभर खाटांच्या उपजिल्हा रुग्णालय इमारतीच्या बांधकामासाठी ७६ कोटी ३७ लाख १६ हजार रुपये मिळणार – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

सटाणा येथील शंभर खाटांच्या उपजिल्हा रुग्णालय इमारतीच्या बांधकामासाठी ७६ कोटी ३७ लाख १६ हजार रुपये मिळणार

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : हर्षल ठाकरे :- सटाणा येथील शंभर खाटांच्या उपजिल्हा रुग्णालय इमारतीच्या बांधकामासाठी ७६ कोटी ३७ लाख १६ हजार रुपये खर्चास राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे.
  • यामुळे तालुकावासीयांना स्थानिक पातळीवरच सर्व अत्याधु निक आरोग्य विषयक सेवा सुविधा उपलब्ध होणार आहेत अशी माहिती आमदार दिलीप बोरसे यांनी दिली आहे.
  • बागलाण तालुक्यातील सर्वाधिक महत्त्वाकांक्षी ठरणाऱ्या उपजिल्हा रुग्णालयाच्या मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू होता.
  • त्यास यश आले असून राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभा गाच्या अवर सचिव कविता पिसे यांनी याबाबतचा शासनादेश काढला आहे असेही आमदार बोरसे यांनी सांगितले.
  • बागलाण हा आदिवासीबहुल तालुका असून अत्यावश्यक वैद्यकीय सेवेसाठी तालुकावासीयांना नाशिक किंवा धुळे येथे जावे लागत होते.
  • यात वेळ पैसा आणि श्रम खर्च होऊनही प्रसंगी वेळेवर उप चार न मिळाल्याने अनेकांना प्राण गमवावे लागत होते.
  • या पार्श्वभूमीवर बागलाण तालुक्यातच कळवणच्या धर्तीवर सर्व सेवा सुविधायुक्त उपजिल्हा रुग्णालय निर्माण व्हावे यासाठी शासनाकडे प्रस्ताव दाखल करून मंजुरीसाठी पाठपुरावा करण्यात येत होता.
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरो ग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्याकडे या उपजिल्हा रुग्णाल याच्या मंजुरीसाठी सातत्याने गाठीभेटी घेऊन पाठपुरावा केला.
  • त्यास यश आले असे सांगून तालुक्याची महत्त्वपूर्ण गरज पूर्ण केल्याबद्दल तालुकावासियांतर्फे आमदार बोरसे यांनी मंत्री महोदयांचे ऋणही व्यक्त केले आहेत.
  • भाक्षी परिसरात इमारत साकारणार
  • शंभर खाटांची उपजिल्हा रुग्णालयाची इमारत भाक्षी परिसरा त उभारण्यात येणार असून त्या पार्श्वभूमीवर भाक्षीला येऊन मिळणारे चौगाव-भाक्षी, वनोली-भाक्षी व सटाणा शहर ते भाक्षी या सर्व रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम यापूर्वीच हाती घेण्यात आले आहे.
  • या इमारत बांधकामामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग, फर्निचर, विद्यु तीकरण, पाणीपुरवठा व मल निसा:रण, आग प्रतिबंधक, पार्किंग, अंतर्गत रस्ते, संरक्षण भिंत, गेट, भूविकास, वातानु कूलित यंत्रणा व सीसीटीव्ही आदींची तरतूद करण्यात आली आहे.
  • या बांधकामाची प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली असून लवकरच टेंडर काढून प्रत्यक्ष कामासही लवकरच सुरवात होईल.
  • तालुकावासीयांना अद्ययावत दर्जेदार मोफत शासकीय आरो ग्य सेवा स्थानिक पातळीवरच उपलब्ध होईल आणि आता पर्यंत होणारी गैरसोय टळेल असा आत्मविश्वासही आमदार बोरसे यांनी व्यक्त केला आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा