नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , आदर्शगाव विरसई येथे विविध उपक्रमांनी महाशिवरात्री उत्सव साजरा..! रेकॉर्ड डान्स स्पर्धेत चिपळूणच्या एन के कलामंचचा प्रथम क्रमांक, तर कबड्डी स्पर्धेत श्री साई वणंद संघ प्रथम. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

आदर्शगाव विरसई येथे विविध उपक्रमांनी महाशिवरात्री उत्सव साजरा..! रेकॉर्ड डान्स स्पर्धेत चिपळूणच्या एन के कलामंचचा प्रथम क्रमांक, तर कबड्डी स्पर्धेत श्री साई वणंद संघ प्रथम.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : कल्पेश राणे :- महाराष्ट्र शासन पुरस्कृत आद र्शगाव विरसई येथे महाशिवरात्री उत्सव विविध धार्मिक, सामाजिक,सांस्कृतिक, शैक्षणिक व क्रीडाविषयक उपक्रमांचे व महिलांचे हळदीकुंकू आयोजन करून साजरा करण्यात आला.
  • कार्यक्रमाला दापोली विधानसभेचे आमदार मा.श्री.योगेश दा दा कदम यांनी भेट दिली व विरसई गावातील विविध विकास कामांची भूमीपुजने व कार्यवाही तसेच नवीन कामांना मंजुरी देण्याचे संबंधित खात्यांना आदेश देऊ असे सांगितले.
  • तसेच यावेळी आर. आर. आबा स्वच्छ गाव पुरस्कार अंतर्गत ग्रामपंचायत विरसई यांनी बांधलेल्या कै. रामचंद्र नारायण राणे बालस्नेही उद्यानाचे उद्घाटन मालाडचे माजी नगरसेवक श्री. अजित रावराणे यांचे हस्ते करण्यात आले.
  • त्याचप्रमाणे विरेश्वर विद्यालय विरसईला ५२ गुंठे जागा विनामूल्य उपलब्ध करून दिल्याबद्दल कै. रामचंद्र येसू जाधव यांच्या पुतळ्याचे अनावरण विरसई जनसेवा मंडळातर्फे करण्यात आले.
  • यावेळी दापोली तालुका कबड्डी असोशिएशन पुरस्कृत तालुकास्तरीय भव्य कबड्डी स्पर्धांचे आयोजन कार्यवाहक श्री, नितीन बांद्रे यांचे मार्गदर्शनाने केले.
  • या स्पर्धेत श्री साई कबड्डी संघ वणंद यांनी प्रथम तर गजानन संघर्ष कबड्डी संघ केळशी यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. त्याचप्रमाणे जिल्हास्तरीय समूह व एकेरी नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
  • या स्पर्धांत समूह नृत्यप्रकारात चिपळूणच्या एन के कला मंचाने सादर केलेल्या डांगी नृत्याला प्रथम तर मंडणगच्या डी स्क्वॉड कलामंचाने सादर केलेल्या गोंधळ नृत्याला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला.
  • तसेच एकेरी नृत्यासाठी दापोलीच्या अंकिता गुरव लावणीला प्रथम, खेडच्या वेदिका मोरे हिच्या शिवतांडव नृत्याला द्वितीय व खेडच्या प्रणीत वनगुले यांच्या आईचे महत्व या नृत्याला तृतीय क्रमांक प्राप्त झाला.
  • तसेच यावेळी शालेय विद्यार्थ्यांसाठी माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत जाणीव जागृतीसाठी विविध टाकाऊपासून टिकाऊ, वनस्पतींचे बीज संकलन व विड अल्बम या स्पर्धाचे सहा गटात आयोजन केले होते.
  • प्राथमिक ग्रामीण गटात प्रथम क्रमांक वेद किशोर राणे (७ वी), द्वितीय क्रमांक विनित विनय राणे (४थी), तृतीय क्रमांक मानवी महेंद्र पेडामकर (४ थी) प्राथमिक मुंबई गटात प्रथम क्रमांक आर्यन संदीप राणे (७ वी),
  • द्वितीय क्रमांक इशान निलेश तांबुटकर (२री), तृतीय क्रमांक नक्षत्रा संतोष राणे (३री), माध्यमिक गटात प्रथम क्रमांक तन्वी यशवंत राणे (८वी),
  • द्वितीय क्रमांक सार्थक महेंद्र पिंपळकर (९ वी) व तृतीय क्रमांक प्रेम राजेंद्र तांबुटकर (१०वी), बीज संकलन प्राथमिक गटात प्रथम क्रमांक पूर्वा दिलीप पिंपळकर (६ वी),
  • द्वितीय क्रमांक सृष्टी सुभाष पिंपळकर (६ वी) व तृतीय क्रमांक आकृती विजय शिगवण (७वी), माध्यमिक गटात प्रथम क्रमांक केतकी राजेंद्र तांबुटकर (८ वी),
  • द्वितीय क्रमांक जान्हवी सहदेव राणे (१०वी) व तृतीय क्रमांक लावण्या अनंत फराटे (८ वी) व विड अल्बम खुल्या गटात प्रथम क्रमांक सलोनी रुपेश तांबुटकर (१०वी),
  • द्वितीय क्रमांक जान्हवी राजेंद्र तांबुटकर (६वी) व तृतीय क्रमांक निधी यशवंत राणे (६वी) सर्व स्पर्धातील विजेत्या स्पर्धकाला रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.
  • तसेच यावेळी जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी राबविलेल्या ना सा अमेरिका व इस्रो भारत या स्पर्धा परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विरसईच्या निवड झालेल्या कु.जान्हवी राजें द्र तांबुटकर व तालुकास्तर स्पर्धा परीक्षेत निवड झालेल्या अथर्व गणेश तांबीटकर, सक्षम रुपेश तांबुटकर, वेद किशोर राणे, धीरज आनंद धोत्रे, पूर्वा दिलीप पिंपळकर, सृष्टी सुभाष पिंपळकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
  • या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विरसई जनसेवा मंडळ व महिला मंडळ यांनी अथक परिश्रम घेतले.
  • कार्यक्रमाला दापोली विधानसभेचे आमदार श्री.योगेशदादा कदम, माजी समाजकल्याण सभापती श्री.भगवान घाडगे, माजी जि.प. अध्यक्षा सौ.रोहिणी दळवी, माजी सभापती श्री.उन्मेष राजे, श्री.सुनिल दळवी, उपतालुका प्रमुख श्री.गुणा जी गावणूक, गणेश गावणूक, दापोली नगरसेविका सौ.साध ना बोत्रे, माजी सभापती सौ.योगिता बांद्रे, विरसईच्या सरपंच सौ.मनोरमा राणे, मुंबई मंडळाचे सचिव श्री.सुरेश बेटकर, उपसचिव श्री. संदीप राणे, ग्रामीण अध्यक्ष श्री.कृष्णा राणे, सचिव अनिल पिंपळकर, कार्याध्यक्ष श्री.दिनेश राणे, महिला मंडळ अध्यक्षा सौ.सुनीता जाधव, सचिव सौ.सारिका राणे, ग्रामसेवक श्री. विरेश कदम, सेवानिवृत्त तलाठी श्री.गोपीनाथ चौधरी, वेळवी सरपंच रणजीत दळवी, कुडावळे सरपंच प्रमोद कदम, तोंडली सरपंच सौ.चंद्रभागा जाधव, कादिवली सरपंच श्री.माने. विरेश्वर विद्यालयाचे मख्याध्यापक श्री.सुनीलकुमार गोरीवले जि.प.शाळेचे मख्याध्यापक श्री.संदीप भेकत सर्व ग्रामपंचायत सदस्य व मंडळातील सर्व सदस्य उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दिनेश राणे यांनी केले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा