
मोकाट जनावरांचा बंदोबस्त न केल्यास राजापूरात ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी व वाहन चालकांचा तीव्र आंदोलनाचा इशारा.
- प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- मुंबई गोवा महामा र्गावर राजापूर तालुक्यात वाटूळ ते पुढे हातिवले टोलना का ते पन्हळे टाकेवाडी खारेपाटण पर्यंत मोठ्या प्रमाणात रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट गुरांमुळे वारंवार अपघात होत आहेत.
- यात मुकी जनावरे जखमी होत आहेत व मृत्यूमुखीही पड त आहेत तर अपघात होऊन वाहनचालकांसह प्रवाशांच्या जीवितासही मोठा धोका निर्माण होत आहे.
- यासाठी या मोकाट गुरांचा बंदोबस्त करावा. अशा प्रकारे मोकाट गुरे सोडणाऱ्या गुरे मालकांवर त्वरित कारवाई करावी व महामार्गावरील प्रवास सुरक्षित करावा.
- यासाठी सोमवारी हातिवले टोलनाक्यावर स्थानिक ग्राम स्थ, रिक्षा संघटना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी,वाहन चाल क व राजापूर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी येत प्रशासनाचे लक्ष वेधले.

- अशा प्रकारे आपली गुरे मोकाट सोडून अपघाताला कार णीभूत ठरणाऱ्या गुरे मालकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
- याबाबतचे एक लेखी निवेदन स्थानिक ग्रामस्थ, रिक्षा संघ टना यांच्या वतीने महामार्ग विभागाचे अधिकारी व राजा पूर पोलिसांना देण्यात आले.
- याबाबत गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई झाली नाही तर ती व्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे मुंबई गोवा महामार्गावर अनेक अपघात होत आहेत.
- वाटूळ ते पन्हळे खारेपाटण दरम्यान मोठ्या प्रमाणात फि रणारी मोकाट गुरे हे अपघाताचे मूळ कारण आहे.
- हातिवले टोलनाका, राजापूर एसटी डेपोच्या पुढे ब्रिजवर ओणी,वाटूळ येथे अनेक ठिकाणी मोकाट गुरे रस्त्यावर ब सलेली असतात.यामुळे अनेकवेळा अपघात होतात.
- यात वाहनांचे नुकसान होतेच परंतु प्रवाशीही जखमी हो तात. मोकाट गुरेही जखमी होतात याबाबत वारंवार तक्रा र करूनही कोणतीही दखल घेतली जात नाही.
- या विरोधात सोमवारी एकत्र येत हातिवले तिठा येथे आंदो लन करण्यात आले. या मोकाट गुरांचा बंदोबस्त करावा व गुरे मालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करण्यात आली.
- यावेळी महामार्ग विभागाचे श्री कुमावत व राजापूर पोलि स निरीक्षक अमित यादव यांना स्थानिक ग्रामस्थ, रिक्षा संघटना यांच्या वतीने एक निवेदन देण्यात आले.
- यावेळी कार्यवाही करण्याची ग्वाही कुमावत आणि यादव यांनी दिली आहे.याबाबत त्या त्या गावातील पोलिस पाटी ल व सरपंच यांनी संबंधित गुरे मालकांना माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले.
- याप्रसंगी अशफाक हाजू, दिपक बेंद्रे, अरविंद लांजेकर, सं दीप राऊत, प्रतीक सप्रे, कोदवली सरपंच प्रणोती भोसले, हातिवले सरपंच नाना गोटम,यांसह कोंडगे सरपंच तसेच जुवाठीचे प्रसाद मोहरकर, प्रशांत जोशी, नाना पवार, दीप क धालवलकर,अजित घाणेकर, महेश कारेकर, प्रशांत मों डकर, रवींद्र सावंत, सुरज मोरे, जयकांत मोरे, प्रदीप आंब वले, विनायक बिंदूकडे,संजय तळवडेकर, दत्तात्रय तळव डेकर आदींसह हातिवले व कोंडगे येथील रिक्षा चालक मा लक संघटना पदाधिकारी व रिक्षा व्यावसायिक,वाहन चा लक तसेच परिसरातील सर्व सरपंच,पोलिस पाटील, हाति वले तळगाव पन्हाळे, वाटूळ,कोंडये, उन्हाळे, राजापूर शहर,कोदवली, नेरके, खरवते, ओणी,वाटूळ या गावातील ग्रामस्थ व वाहन चालक उपस्थित होते.
- याप्रकरणी मंगळवारी आमदार किरण सामंत यांची भेट घेऊन त्यांच्याकडे हा विषय मांडण्यात येणार असल्याचे अरविंद लांजेकर यांनी सांगितले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











