जनसेवा युवा प्रतिष्ठानने बांधला श्रमदानातून बंधारा.

  • प्रतिनिधी : गुहागर : प्रमोद तरळ :- तालुक्यातील जन सेवा युवा प्रतिष्ठान ही संघटना गेली सात वर्षे पालपेणे गा वातील कुंभार वाडीत कार्यरत असून अनेक सामाजिक उपक्रम राबवत असते.
  • कोरोना काळात गरजू व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंचे पॅक देणे, प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप करणे, प्राथमिक शाळेतील अडचणी समजून त्या प्रमाणे मदत करणे. असे समाजोपयोगी उपक्रम प्रतिष्ठान राबवत असते.
  • वादळामुळे बस थांब्याची शेड पडल्यानंतर प्रतिष्ठान तर्फे श्रमदान आणि आर्थिक मदत उभी करून ती बांधण्यात आली.
  • आज वाडीतील नागरिक ह्या वस्तूचा लाभ घेत आहेत. अशाप्रकारे प्रतिष्ठानची समाजकार्यात यशस्वी वाटचाल सुरू आहे.
  • गेली दोन वर्षे प्रतिष्ठान तर्फे “किल्ला शिवरायांचा -किल्ला बांधणी स्पर्धा” स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.
  • ह्या स्पर्धेला खूप चांगला प्रतिसाद मिळतो तसेच सहभागी विद्यार्थ्यां सुद्धा अतिशय अभ्यासपूर्ण आणि कल्पकतेने किल्ला बनवितात.
  • याही वर्षी हा उपक्रम यशस्वीपणे राबवून विजेत्या स्पर्ध कांना बक्षिसे देण्यात आली. तसेच सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि शालोपयोगी वस्तू भेट देण्यात आल्या.
  • तसेच याच वर्षी दिवाळीच्या भाऊबीज दिवशी जलसंधा रण उपक्रमा अंतर्गत नदीच्या पात्रात बंधारा बांधण्यात आला.
  • पाण्याची उन्हाळ्यात होणारी टंचाई आणि दिवसेंदिवस पाण्याची खाली जाणारी भूजल पातळी ह्याचा विचार करून प्रतिष्ठानने हे पाऊल उचलले आहे.
  • थोडा वेळ समाज कार्यासाठी दिला तर एक महत्त्वाचे का म उभे राहू शकते हा संदेश तरुणांनी या कामातून दिला आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles