नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , भास्कर इन्व्हेस्टिगेशन सी.एस.आर फंडमध्ये दरवर्षी सरासरी 23 हजार कोटी रुपयांची देणगी, पण ६५ टक्के रक्कम साटेलोटे करून कंपन्यांकडे पुन्हा परत.  – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

भास्कर इन्व्हेस्टिगेशन सी.एस.आर फंडमध्ये दरवर्षी सरासरी 23 हजार कोटी रुपयांची देणगी, पण ६५ टक्के रक्कम साटेलोटे करून कंपन्यांकडे पुन्हा परत. 

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : छ.संभाजीनगर : संदीप कारके :- देशात गेल्या पाच वर्षांत १,१४,७७१ कोटी रुपये सीएसआर (कॉर्पोरेट सो शल रिस्पॉन्सिबिलिटी) एवढा निधी आला. म्हणजेच दरवर्षी कंपन्यांनी सरासरी २३ हजार कोटी रुपयांचे सामाजिक कार्या च्या नावाखाली दान केले आहे.
  • खरे तर या निधीचा मोठा भाग कागदावर खर्च होत असतो. सर्वच मोठ्या शहरांत सीएसआर फंडाचे वाटप आणि त्याच्या आडून फसवणुकीचा गोरखधंदा सुरू आहे.
  • ‘भास्कर’ने गेल्या काही प्रकरणांचा तपास केला तेव्हा धक्का दायक माहिती समोर आली. कंपनी अॅक्ट २०१३ अंतर्गत नफ्यातील २ टक्के सामाजिक कार्यावर खर्च करणे बंधनकारक आहे.
  • विश्वस्त, एनजीओ याच फंडातील ६५ टक्के रक्कम कंपनी ला परत करतात. संस्था खोटे बिल तयार करून १०० टक्के रक्कम खर्च केल्याचे दाखवतात.
  • कंपनी फॉर्म एओसी-४ मध्ये सीएसआर फंडाचा तपशील देतात. ऑडिटर केवळ हाच अर्ज बघतात. निधीचे काय झाले हे बघत नाहीत.
  • आयकरच्या तपासात या गोरखधंद्यात महाराष्ट्रासह अनेक राज्यांतील निवृत्त आयएएस, आयपीएस अधिकारी सामील आहेत.
  • सीएसआरचा गोरखधंदा… कंपन्या, संस्थांमध्ये निधीचे असे होते वाटप
  • गोदामांत रोकड दडवली जाते, कुठेही पैसा पुरवतात निधीची स्वीकृती दाखवून अॅडव्हान्स देतात रक्कम
  • आंगडिया हिरा व्यापाऱ्यांसाठी कुरिअरचे काम करणाऱ्या आंगडियांची (कुरिअर) सीएसआर फंडशी संबंधित व्यवहारात भूमिका दिसते.
  • कंपन्यांचे परत जाणारे कोट्यवधी रुपये आंगडिया फर्मद्वारे देश व हवालाद्वारे दुबईत जातात. अशा फर्म्स दिल्ली, मुंबई, गुजरातच्या नोएडातही आहेत.
  • आंगडिया गोदामात मोठ्या भांडवलदारांचा रोख पैसा दडवून ठेवतात. संपूर्ण उद्योग चिठ्ठीवरून चालतो. त्यावर दहाची अर्धी नोट चिकटवलेली असते.
  • त्याचा अर्घा भाग आंगडियाच्या रजिस्टरमध्ये असतो. नोटेचा क्रमांक जुळवून रोख व्हॅनने पाठवली जाते.
  • बोगस पत्राद्वारे संस्थांची केली जाते फसवणूक
  • मध्यस्थ… २०२२ मध्ये नोएडा पोलिसांनी ८ मध्यस्थांकडून ५ कोटींहून अधिक जप्त केले. ही रक्कम एका एनजीओला दिलेल्या सीएसआर निधीचे कमिशन म्हणून घेतली.
  • आयकर तपासात कॉर्पोरेट घराणे, नेते, एनजीओ व ट्रस्टचा सहभाग असल्याचे दिसले. आयकर अधिकाऱ्यानुसार ‘यूपी, हरियाणा व महाराष्ट्रातील राजकीय व गुजरातचे आर्थिक संबंध समोर आल्यानंतर कारवाई होऊ शकली नाही.
  • ‘ टोळीने १३५० कोटी निधीचे समान वाटप केले. अनेक बड्या कंपन्यांनी ४० पेक्षा जास्त एनजीओ व ट्रस्टना ही रक्कम दिली.
  • मात्र, त्यापूर्वी फंडिंगचे स्वीकृतिपत्र दाखवून ६५% रक्कम कंपन्यांना अॅडव्हान्स दिली.
  • बोगस प्रतिनिधी… कंपन्यांचा बोगस प्रतिनिधी बनून कोट्य वर्षीची फसवणूक होते. भामटे सीएसआर फंड स्वीकृतीचे बनावट पत्र किंवा चेक संस्थांना देऊन त्यांच्याकडून २ कोटी रुपयांपर्यंत अॅडव्हान्स उकळतात.
  • मुंबई, बंगळुरू व गुरुग्राममध्ये अशी काही प्रकरणे उघडकीस आली आहेत. पोलिस चौकशीत समजले की, मुंबईतील कुरिअर कंपन्यांमार्फत पैसे ट्रान्सफर केले जातात.
  • बिल अँड मिलिंडा गेट्स फाउंडेशनचे प्रोजेक्ट मॅनेजर सांगता त, भारतात सीएसआर फंडाचा गैरवापर करणे सहज शक्य आहे. सरकारकडूनही त्याचा स्वहितासाठी वापर केला जातो.
  • देशातील सी.एस.आर फंड दरवर्षी वाढतेय रक्कम
  • आर्थिक वर्ष कंपन्या
  • 2021-22
  • 2020-21_ _20,840
  • 2019-20_ _ 22,985
  • 2018-19_ _25,181
  • 2017-18_ _21,525, 19,043
  • एकूण फंड (कोटीत)
  • 26,278.71
  • 26,210.95
  • 24,965.82
  • 20,217.65
  • 43,388
  • 39,324
  • 35,290
  • 17,098.57
  • प्रोजेक्ट्स
  • 32,071
  • 26,585
  • स्रोत : मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स.
  • सी.एस.आर फंडात या आहेत त्रुटी अर्थ व कंपन्यांच्या प्रकरणांचे अभ्यासक सांगतात, सीएसआर फंडाच्या प्रक्रियेत अनेक त्रुटी आहेत.
  • त्यामुळे दरवर्षी हजारो कोटी रुपयांचे ६५:३५ च्या प्रमाणात कंपन्या व संस्थांमध्ये वाटप केले जाते. हे पकडले गेले तर कंपन्या स्वीकृतिपत्र बनावट असल्याचे सांगून चौकशीपासून बचाव करतात.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा