नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , सहकाराची पंढरी म्हणून ओळख असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील सहकारी संस्था अडचणीत; दोन वर्षांत जिल्ह्यातील नऊ पतसंस्थांवर प्रशासक; सहकारी बँकांचे अस्तित्व धोक्यात – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

सहकाराची पंढरी म्हणून ओळख असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील सहकारी संस्था अडचणीत; दोन वर्षांत जिल्ह्यातील नऊ पतसंस्थांवर प्रशासक; सहकारी बँकांचे अस्तित्व धोक्यात

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : शकील मुलानी :- सहकाराची पंढरी म्हणून ओळख असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील सहकारी संस्था अडचणीत येऊ लागल्या आहेत.
  • २२ वर्षांत १० सहकारी बँकांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. दहा पैकी तीन बँकांची नोंदणीच रद्द झाली आहे. सात बँका आजही अवसायनात आहेत.
  • या बँका पुन्हा उभा राहण्याची शक्यता कमीच आहे. सोलापूर जिल्हा महिला सहकारी बँक २००३ मध्ये अवसायनात घेण्यात आली होती.
  • सोलापूर मर्चंट को. ऑप. बँक २००३ मध्ये अवसायनात घेण्यात आली होती. सेवालाल अर्बन को. ऑप. बँक २००२ मध्ये अवसायनात घेण्यात आली होती.
  • या तिन्ही बँकांची आता नोंदणी रद्द झाल्याने सहकारातून या बँकांचे अस्तित्व कायमस्वरूपी संपले आहे.
  • सोलापूर जिल्हा औद्योगिक सहकारी बँक, इंदिरा श्रमिक म हिला सहकारी बँक, सोलापूर नागरी औद्योगिक सहकारी बँ क, भारत अर्बन को.ऑप. बँक, अर्जून अर्बन को. ऑप. बँक, स्वामी समर्थ सहकारी बँक, लक्ष्मी अर्बन को. ऑप. बँक या सात सहकारी बँका सध्या अवसायनात आहेत.
  • दोन वर्षात जिल्ह्यातील जवळपास सात सहकारी पतसंस्थां वर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • त्यामध्ये मंगळवेढ्यातील मंगळवेढा म्युन्सिपल एम्प्लॉईज क्रेडिट को.ऑप.सोसायटी, खंडाळी येथील मोतीचंद कोठा डिया ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्था, वळसंग येथील सिद्धेश्‍वर महिला ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्था,
  • लिंबी चिंचोळी येथील स्वामी समर्थ ग्रामिण बिगर शेती सह कारी पतसंस्था, मंद्रूप येथील साहेब हजर काझी ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्था, कंदलगाव येथील भैरवनाथ ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था,
  • करमाळ्यातील म्युन्सिपल सर्वन्ट को.ऑप. क्रेडिट सोसायटी, करमाळ्यातील रणजितसिंह मोहिते-पाटील ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्था, मोहनलाल दोशी नागरी सहकारी पतसंस्था अशा जिल्ह्यातील नऊ पतसंस्थांवर एक ते दोन वर्षांत प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • ज्यांची पत आहे व ज्यांची कर्जफेडीची स्थिती आहे, त्यांना कर्जपुरवठा करावा. खाते एनपीएमध्ये गेल्यानंतर वसुली साठी प्रयत्न करण्यापेक्षा, पहिला हप्ता थकल्यानंतरच वसु लीची प्रक्रिया गतीमान करावी.
  • तारण व विनातारण कर्जासाठी आरबीआयने दिलेल्या नियमां चे तंतोतंत पालन करावे. लेखापरीक्षणासाठी अचूक व्यक्ती नेमावी. लेखापरीक्षणातून समोर आलेल्या स्थिती नूसार आर्थिक संस्थेच्या व्यवस्थापनाचे काम करावे.
  • – किरण गायकवाड, जिल्हा उपनिबंधक
  • सहकारी बँका वाचविण्यासाठी असोसिएशनचा पुढाकार महत्त्वाचा आहे. बँक अडचणीत आल्यावर उपाययोजना करण्यापेक्षा बँक अडचणीतच येऊ नये यासाठी उपाययोजना करणे आवश्‍यक आहे.
  • बँकेचे संचालकपद आता मिरविण्यासाठी नाही तर आर.बी. आय च्या नियमांचा सातत्याने अभ्यास करून बँक पातळीवर उपाययोजना राबविण्याचे झाले आहे.
  • – श्रीकांत मोरे, सहकारातील तज्ज्ञ
  • चुकीच्या पद्धतीने कर्जवाटप झाल्यास नंतर सर्वच बाबी चुकीच्या पद्धतीने होतात. सहकारी बँकांकडे असलेल्या थकबाकीदारांची यादी करून ती यादी इतर बँकांना दिली जाणार आहे.
  • त्यामुळे एखाद्या व्यक्तीमुळे एक बँक अडचणीत आली असेल तर इतर बँका सावध होतील.
  • – अशोक लुणावत, अध्यक्ष, सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक्स्‌ असो.
  • ज्या प्रमाणात कर्जवाटप होते, त्या प्रमाणात कर्ज वसुली होत नाही. एनपीएमध्ये बँक येण्यास सुरवात झाली तर हळूहळू स्थिती हाताबाहेर जाते.
  • त्यामुळे एखादे खाते एनपीए होऊ लागल्यास बँकेने दक्ष राहण्याची आवश्‍यकता आहे. ठेवी व कर्जवाटपाचा रेषो काटेकोरपणे पाळला पाहिजे.
  • – मोहन दाते, संचालक, समर्थ सहकारी बँक, सोलापूर
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा