नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , महिलेने रुग्णवाहिकेतच दिला बाळाला जन्म…! स्त्री रोगतज्ज्ञ नसल्याने गरोदर मातांची उपेक्षा कायम – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

महिलेने रुग्णवाहिकेतच दिला बाळाला जन्म…! स्त्री रोगतज्ज्ञ नसल्याने गरोदर मातांची उपेक्षा कायम

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : राजाराम खांगड :- स्त्री रोगतज्ज्ञ नसल्याने पेठ येथील गरोदर माता व बाळाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयातही स्त्री रोगतज्ज्ञाचे पद रिक्त असल्याचे निदर्शनास आले आहे.
  • जोखमीची माता म्हणून जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आलेल्या मातेची रुग्णवाहिकेतच प्रसुती झाल्याने पुन्हा एकदा गरोदर मातांची ग्रामीण भागात होणारी उपेक्षा समोर आली आहे.
  • विशेष म्हणजे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यां च्या तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात स्त्री रोगतज्ज्ञ पद रिक्त असल्याने गरोदर मातांची हेळसांड होत आहे.
  • त्यामुळे ग्रामीण भागातील मातांना मुबलक आरोग्य सेवा कधी मिळणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
  • कळवण तालुक्यातील गोळाखाल येथील छकुली चेतन महा ले ही माता प्रसुतीसाठी शनिवारी (ता. ७) सकाळी ११ च्या दरम्यान कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाली.
  • तेथील वैद्यकीय अधिकाऱ्‍यांनी त्या मातेने यापूर्वी केलेल्या सोनोग्राफीच्या अहवालाची तपासणी केली.
  • त्या अहवालात गर्भामध्ये असलेल्या बाळाचे ह्रदय हे विरुद्ध बाजूने असून, ह्रदयाला छिद्र असल्याचे निदर्शनास आले.
  • सदर बाळाला लागणाऱ्‍या आवश्यक त्या सुविधा कळवण उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध नसल्याने त्या मातेला जि ल्हा रुग्णालयात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.
  • उपजिल्हा रुग्णालयातील १०२ रुग्णवाहिका सदर मातेला जिल्हा रुग्णालयात घेऊन निघाली. परंतु, वणीजवळ या मातेची रुग्णवाहिकेतच प्रसुती झाल्याने नातेवाईकांची तारां बळ उडाली.
  • संबंधित रुग्णवाहिकेच्या चालकाने प्रसंगावधान राखून वणी ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिका वळवली.
  • तेथील उपस्थित बाल रोगतज्ज्ञ डॉ. नेहा सिंगल यांनी तत्काळ रुग्णालयात दाखल करुन घेत माता व बाळावर आवश्यक ते प्राथमिक उपचार करीत पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णाल यात पाठविले.
  • कळवण उपजिल्हा रुग्णालयात स्त्री रोगतज्ज्ञ हे पद आजही रिक्त आहे. स्त्री रोगतज्ज्ञ रुग्णालयात उपलब्ध असते तर कदाचित रुग्णवाहिकेमध्ये प्रसुती होण्याची वेळ सदर मातेवर आली नसती, असा आरोप केला जात आहे.
  • “गरोदर मातेच्या सोनोग्राफीचा अहवाल तपासणीनंतर बाळा चे ह्रदय विरुद्ध बाजूने असून त्याला छिद्र असल्याचे निदर्श नास आले.
  • प्रसुतीनंतर बाळाला तत्काळ व्हेंटिलेटरची आवश्यकता अस ल्याने बाळाच्या सुरक्षितेसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्या चा निर्णय घेतला.
  • १०८ रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याने १०२ रुग्णवाहिकेमध्ये मातेला पाठवण्यात आले होते.”
  • – डॉ. कमलाकर जाधव, वैद्यकीय अधिकारी, कळवण
  • “सदर गरोदर मातेला १०२ रुग्णावाहिकेमध्ये जिल्हा रुग्णाल यात घेवून जात असताना वणीजवळ महिला रुग्णवाहिके मध्ये प्रसुती झाली.
  • त्यानंतर त्या मातेला वणी ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर त्या बाळाची तपासणी करण्यात आली. मातेला देखील प्राथ मिक उपचार देण्यात आले.
  • बाळाची अवस्था बिकट असल्याने पुढील आवश्यक उपचारा साठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.”
  • – डॉ. नेहा सिंगल, बाल रोगज्तज्ञ, वणी ग्रामीण
  • “प्रसुतीसाठी सकाळी ११ च्या दरम्यान आम्ही कळवण उप जिल्हा रुग्णालयात पोहचलो. डॉक्टरांनी नाशिकला हलव ण्याचे सांगितले.
  • रुग्णवाहिकेमध्ये येत असतांना रस्त्यातच प्रसुती झाली. जि ल्हा रुग्णालयात पाठवण्याच्या आधी कळवण रुग्णालयात प्रसुती झाली असती त्यानंतर बाळ व मातेला जिल्हा रुग्णा लयात पाठवण्याचा निर्णय घेतला असता तर आमचे रस्त्यात हाल झाले नसते.”
  •  – चेतन महाले, पीडीत मातेचा पती
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा