नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , प्रणिती शिंदे यांच्या विरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार; शहरातील ऑटो रिक्षांवर विनापरवाना दोन बाय दोन फूट आकाराचे डिजिटल लावून केला प्रचार. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

प्रणिती शिंदे यांच्या विरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार; शहरातील ऑटो रिक्षांवर विनापरवाना दोन बाय दोन फूट आकाराचे डिजिटल लावून केला प्रचार.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : फारुख मुलानी :- सोलापूर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ ऑटो रिक्षांसह शहरात विविध ठिकाणी विनापरवाना डिजिटल लावून आचारसंहितेचे उल्लंघन केल्या ची तक्रार वैभव बिराजदार यांनी आचारसंहिता कक्षप्रमुख, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांच्याकडे केली आहे.
  • त्यावर तत्काळ कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसह प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिले आहेत.
  • लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. तरीही शहरातील ऑटो रिक्षांवर (क्र. एम एच १३ बी व्ही १६२८, एमएच १३ जी ९६८०) विनापरवाना दोन बाय दोन फूट आकाराचे डिजिटल लावून प्रचार केला जात आहे.
  • त्यावरील संपर्क क्रमांक ७०६६६२४२२२ हा क्रमांक डायल केल्यावर कॉलर आयडीवर काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांचे नाव आढळून येत आहे.
  • तसेच शिंदे यांच्या प्रचारार्थ सोलापूर सोशल फोरमने शहरा तील महापौर बंगला, सात रस्ता चौक, शासकीय विश्रामगृह संरक्षण आवार, रंगभवन चौक, नर्मदा हॉस्पिटल, डफरीन चौक, नवल पेट्रोल पंपानजीक या ठिकाणी विनापरवाना तीन बाय पाच फूट आकाराचे डिजिटल लावून आचारसंहितेचा भंग केला आहे.
  • त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, असे बिराजदार यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यावर आचारसंहिता कक्षप्रमुख कुंभार यांनी याप्रकरणी तातडीने कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा