
कोठारे घाटात पुन्हा बस अपघात – ब्रेक फेलची घटना, सुदैवाने मोठी हानी टळली.
- प्रतिनिधी : हिराजी देसले :-शहापूर तालुक्यातील कोठा रे घाटात पुन्हा एकदा एस.टी. बस अपघातग्रस्त झाली आ हे. 16 एप्रिल रोजी झालेल्या अपघातानंतर केवळ काही दिवसातच ब्रेक फेल होण्याची दुसरी घटना घडली आहे.

- मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित बस चालकाने बसच्या ब्रेकची समस्या वरिष्ठांना लेखी कळवली होती. मात्र वरि ष्ठांच्या आदेशानुसार बस मार्गावर सोडण्यात आली.

- आज प्रवासादरम्यान घाटातच बसचे ब्रेक फेल झाले. बु किंग रजिस्टरनुसार बसमध्ये फक्त 8 प्रवासी नोंदलेले अस ले तरी प्रत्यक्षात सुमारे 40 प्रवासी बसमध्ये होते.

- अचानक ब्रेक फेल झाल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वाताव रण निर्माण झाले. सुदैवाने मोठा अनर्थ टळला असून सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती आहे.

- या घटनेनंतर प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीने एस.टी. प्रशासना च्या निष्काळजीपणावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
- वारंवार ब्रेक फेलच्या घटना घडत असताना जुन्या व जीर्ण बस प्रवाशांच्या जीवाशी खेळ ठरत असल्याची चर्चा स्था निकांमध्ये सुरू आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











