
माय राजापूर’ ने तयार केलेला पर्यटन विकास आराखडा राबविण्यासाठी प्रयत्न – आ.किरण सामंत
- प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- तालुक्याचा पर्यट न दृष्ट्या विकास व्हावा या उद्देशाने माय राजापूरने तयार केलेला पर्यटन विकास आराखडा आ.किरण उर्फ भैय्या सामंत यांना सादर केला.
- या विकास आराखड्यानुसार पर्यटन स्थळांचा विकास क रण्यासाठी आपण शासन स्तरावर प्रयत्न करणार अस ल्याचा शब्द आ.सामंत यांनी माय राजापूर संस्थेला दिला.

- पर्यटन विकासासाठी संबंधित खात्याचे अधिकारी व माय राजापूर संस्था सदस्य यांची लवकरच भेट घडवून आण ण्यात येईल.
- माय राजापूर संस्थेने मंजूर विकास कामांवर लक्ष ठेवणे व दर्जेदार काम होण्यासाठी प्रयत्न करावेत अशी सूचना त्यांनी यावेळी केली.
- माय राजापूर संस्थेचे पदाधिकारी नायब तहसीलदार दिपा ली पंडित, प्रणोती भोसले,सुधा चव्हाण, ॲड.यशवंत का वतकर, नित्यानंद पाटील, प्रदिप कोळेकर, जगदीश पवार – ठोसर, संदीप देशपांडे, नरेश दसवंत, चंद्रशेखर सिनकर, ह्रषिकेश कोळेकर यांनी नुकतीच आमदार किरण सामंत यांची शासकीय विश्रामगृहावर भेट घेतली.
- तालुक्यातील विविध पर्यटन स्थळांना प्रत्यक्ष भेटी देऊन त्याठिकाणी कोणत्या सोयी-सुविधांची आवश्यकता आहे.
- याचा अभ्यास करुन आर्किटेक्ट संदीप पवार यांच्या मार्ग दर्शनाखाली माय राजापूर संस्थेने पर्यटन विकास आरा खडा तयार केला आहे.
- पर्यटन स्थळांवर स्वच्छतागृहे, पार्कींग व्यवस्था,पथदीप ही व्यवस्था ग्रामपंचायत स्तरावर करण्यात यावी.
- अस्तित्वातील रस्त्याची देखभाल दुरुस्ती जिल्हा परिषदे मार्फत व्हावी, मोठे पूल, नवीन रस्ते व नाविन्यपूर्ण बाबी या शासना मार्फत करण्यासाठी या आराखड्याचा उपयोग व्हावा हा प्राथमिक उद्देश असल्याचा माय राजापूरने सां गितले आहे.
- सदर पर्यटन विकास आराखड्यात उन्हाळे येथील राजापू रची गंगा, खडपेवाडी येथील शिवकालीन वखार पुनर्निर्मा ण, शिवकालीन पूल जवाहर चौक, नाटे येथील यशवंत गड, कशेळी सनसेट पॉईंट, वेत्ये समुद्र किनारा, चुनाकोळ वण येथील धबधबा, आंबोळगड समुद्र किनारा, काजिर्डा धबधबा, माडबन समुद्र किनारा, हर्डी येथील कातळकडा धबधबा,दांडे समुद्र किनारा, श्री धुतपापेश्वर मंदिर, कशेळी येथील कनकादित्य मंदिर, आडिवरे येथील श्री महाकाली मंदिर, देवाचेगोठणे येथील श्री भार्गवराम मंदिर, देवीहसो ळ येथील आर्या दुर्गा मंदिर, तेरवण येथील विमलेश्वर मंदि र, मिठगवाणे येथील अंजनेश्वर मंदिर आणि सौंदळ येथी ल ओझरकडा धबधबा आदी पर्यटन स्थळांचा समावेश आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











