संगमेश्वर तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत कसबा हायस्कूलच्या विद्यार्थिनी अजिंक्य मुलांनी पटकाविले उपविजेतेपद.

  • प्रतिनिधी : संगमेश्वर : प्रमोद तरळ :-महाराष्ट्र राज्य क्री डा व युवक संचालनालय, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने दि.११/०९/ २०२५ रोजी श्री शिवाजी माध्यमिक विद्यालय कोसुंब या ठिकाणी १९ वर्ष वयोगट तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले होते.
  • सदर स्पर्धेमध्ये संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी कसबा सं चलित, न्यू इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, कस बा-संगमेश्वर या विद्यालयातील १९ वर्षे वयोगट विद्यार्थी व विद्यार्थीनींचे संघ सहभागी झालेले होते.
  • सदर स्पर्धेत कसबा हायस्कूलच्या १९ वर्षे वयोगट मुलीं च्या कबड्डी संघाने सदर स्पर्धेतील सर्व सामने जिंकून ता लुकास्तरीय स्पर्धेमध्ये अभूतपूर्व यश संपादन करून प्रथ म क्रमांक पटकावला आहे.
  • तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून जिल्हास्त रीय स्पर्धेसाठी कसबा हायस्कूलचा १९ वर्षे वयोगट मुलीं चा संघ संगमेश्वर तालुक्याचे नेतृत्व करणार आहेत.
  • गेल्या अनेक वर्षापासून कसबा हायस्कूलने विविध खेळां च्या स्पर्धांमध्ये तालुका, जिल्हा, विभाग व राज्य स्तरावर यश संपादन करून खेळाच्या क्षेत्रामध्ये आपला एक वेग ळा दबदबा निर्माण केलेला आहे.
  • शाळेच्या परंपरेला साजेसे यश मिळवत कबड्डी संघातील विद्यार्थीनींनी शाळेचे नाव पुनश्च एकदा तालुक्यात मोठे केले आहे.
  • तसेच कसबा हायस्कूलच्या १९ वर्षे वयोगट मुलांच्या संघा ने सदर स्पर्धेत अभूतपूर्व खेळाचे प्रदर्शन करत अंतिम फे रीपर्यंत मजल मारली व अंतिम स्पर्धेच्या अटीतटीच्या सा मन्यात निसटता पराभव झाल्यामुळे तालुकास्तरीय स्पर्धे त द्वितीय क्रमांक पटकावून स्पर्धेमध्ये आपले स्थान सिद्ध केलेले आहे.
  • सदर दोन्ही संघांना विद्यालयातील शिक्षक श्री.एन.एस ओ कटे व श्री यू टी गावडे यांचे मार्गदर्शन लाभले.
  • कबड्डी संघातील प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्था अध्यक्ष कॅप्टन अकबर खलपे, उपाध्यक्ष श्री.नियाज कापडी, उपा ध्यक्ष श्री इब्राहिम काझी, सचिव श्री सईद उपाद्ये, सहसचि व श्री.शौकतअली खलफे,खजिनदार श्री.शिकुर गैबी, सर्व सदस्य, प्राचार्य श्री.एच.जी.शेख, पर्यवेक्षक श्री.एस.ए पटे ल, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांच्यावती ने अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles