नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा इशारा; संभाजीनगर, बीड, नांदेड, जालना, नाशिक, ठाणे, पुण्यात यलो अलर्ट – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा इशारा; संभाजीनगर, बीड, नांदेड, जालना, नाशिक, ठाणे, पुण्यात यलो अलर्ट

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : संदीप कारके :- राज्यात सध्या सातत्याने हवा मानात बदल होत आहेत. सुर्य आग ओकायला लागल्याने कमाल तापमानात वाढ झाली आहे. तर दुसरीकडे राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.
  • शनिवारी अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाने झोडपले आहे. त्यातच आजही विदर्भासह मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता कायम आहे.
  • मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात यलो अलर्ट
    आज कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वारे, विजांसह पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.
  • तर उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे. ठाणे, मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, परभणी, जालना, हिंगोली या भागात आज पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे.
  • तर पुणे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांनाही आज पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.
  • राज्यात पावसाला पोषक हवामान
    दरम्यान, विदर्भापासून कर्नाटक गोव्याच्या किनारपट्टीपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. तर दक्षिण कर्ना टक, दक्षिण तामिळनाडूपर्यंत वाऱ्यांचे प्रवाह खंडीत झाले आहेत.
  • यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. शनिवारीही मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले. काढणीला आलेल्या पिकांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा