नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा राजापूर आयोजित भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा राजापूर आयोजित भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : मुंबई : प्रमोद तरळ :- एम.पी.व्ही.एस क्रिकेट विभागवतीने रविवार दि. १४ एप्रिल, २०२४ रोजी नायगांव येथील उमेला गाव, बाभळी मैदान येथे लांजा राजापूर तालु क्यातील गाव अंतर्गत मर्यादित षटकांच्या ओव्हर आर्म क्रिके ट सामने आयोजित करण्यात आले होते.
  • ७ व्या पर्वातील “एमपीव्हीएस क्रिकेट लीग २०२४” स्पर्धेसा ठी एकूण १६ संघानी सहभाग नोंदवला होता. स्पर्धेत झुंजार कुवे, लांजा हा संघ प्रथमच या स्पर्धेत खेळत होता मात्र दम दार प्रदर्शनाने अंतिम सामन्यात मजल मारण्यास यश आले.
  • ठाणेश्वर निओशी-लांजा या बलाढ्य संघाने ७ व्या पर्वाचे जेतेपद पटकावले. स्पर्धेत ठाणेश्वर निओशी संघाचा सलामी वीर अष्टपैलू मिलिंद पडयार मालिकावीर, मकरंद पडयार उत्कृष्ट गोलंदाज ठरला तर झुंजार कुवे संघाचा सलामीवीर राकेश काळे उत्कृष्ट फलंदाज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • चौंडेश्वरी क्रिकेट क्लब शिवणे, राजापूर हा संघ शिस्तबद्ध म्हणून घोषित करण्यात आला. समालोचक म्हणून सुनील मोर्ये, परेश भारती तर गुणलेखनसाठी योगेश करंबेळे, सतीश मांडवकर यांनी कामगिरी केली.
  • तर भानुदास राऊत आणि सुशांत खेराडे यांनी पंचाची भूमि का पार पाडली. कलाशिक्षण विकास मंच सडवली टीम तर्फे पाण्याची व्यवस्था करण्यात आली. आर्थिक, चषक – साहि त्य तसेच जाहिरात स्वरूपात स्पर्धा यशस्वीतेसाठी अनेकांनी सहकार्य केले त्यांचे मनःपूर्वक आभार.
  • ग्रामीण क्रिकेट तरुणांना भिकेला लावणार…? सोशल मीडि यावर ही एक पोस्ट मोठ्या प्रमाणात वायरल होतेय. क्रिकेट ला लोकप्रियता देणारे ही आपणच आणि क्रिकेटला वाईट म्हणवणारे ही आपणच.
  • क्रिकेटची लोकप्रियता एवढी वाढली की आज हजारो आयो जक क्रिकेट स्पर्धा आयोजन करीत असतात. अर्थातच त्यांचे उद्देशही तशे अनेक असतात. क्रिकेटची क्रेज (प्रसिद्धी) जास्त असल्याने अनेक तरुण करिअर करण्याआधीच क्रिकेटशी संलग्न होतात.
  • त्यामुळे मानसिक, शैक्षणिक आणि आर्थिक बाबींवर त्याचा परिणाम होत असेलही. परंतु कोणत्याही गोष्टीचा मतितार्थ समजून न घेता त्यास दूषण देणे हाही मानसिक आणि बौद्धिक अक्षमतेचा भाग आहे.
  • क्रिकेट हे असे माध्यम आहे ज्यात जात धर्म मानला जात नाही, काळा-गोरा वर्ण भेद मानला जात नाही. क्रिकेटला नात्याचं किंवा वयाचे बंधन नसत. क्रिकेट हे एक मनोसक्त आनंद घेण्याचा मैदानी मंच आहे.
  • त्यामुळे सर्वजण एक होऊन तो खेळ खेळतात. आपुलकीने आणि सांघिक भावनेने खेळला जाणार खेळ म्हणजे क्रिकेट! त्यामुळे सांघिक आणि एकीची भावना रुजविण्यासाठी क्रिकेट स्पर्धा आयोजन करून आयोजक मंडळी वेगवेगळ्या स्पर्धा राबवत असतात.
  • क्रिकेट म्हणजे काय? आपलेपण म्हणजे काय? खरंच हे अलिकडे बाभळी मैदान नायगाव येथे झालेल्या अंतिम सामन्यात पाहायला मिळाले.
  • आपली टीम जिंकावी. आपली पोरं जिंकावी. या एकच भाव नेपोटी मैदानाच्या बाहेर सीमारेषेवर उभे राहून संघाच्या चांग ल्या खेळीसाठी, आपल्या सहकाऱ्यांसाठी प्रार्थना करणारी. ग्रामदेवतेचे नामस्मरण करणारी, त्यांची काळजी घेणारी वरिष्ठ जाणकार मंडळीही दिसली.
  • आपला गाव जिंकावा. आपल्या गावाचं नाव व्हावं म्हणून दिवसदिवस रखरखत्या उन्हात उभी राहणारी जिवाभावाची माणसे पाहिली आणि विजय मिळवल्यावर त्यांना डोक्यावर घेऊन नाचणारी ती वेडी मायाळू माणसे मिळाली.
  • एवढा जिव्हाळा, एवढं प्रेम देणारी माणसे गावागावात आहेत. ती एकत्र राहिली तर असे क्रिकेट भिकेला लावणारे नसून ते आपल्या माणसांसाठी प्रेमाचे रिंगणच ठरेल.
  • नेतृत्व गुण अनेकांमध्ये असतात फक्त ते हेरून त्यासाठी संधी मिळणे आणि मिळालेल्या संधीतून अस्तित्व निर्माण करणे हे प्रत्येकाला जमलं पाहिजे.
  • सर्वाना ज्ञात आहे “मुचकुंदी परिसर विकास संघ हे संघटन नसून ही एक चळवळ आहे. आपल्या माणसांनी एकत्र येत आपल्यालासाठी बनविलेले संघटन आहे.
  • अशा उपक्रमाच्या आयोजनांतून अनेकांना त्यांच्या कलागु णांना वाव मिळून विविध संधी तयार होत असतात. मात्र संधी म्हणजे क्रिकेटचा खेळ नसून त्यानुषंगाने उत्तम वक्ता (समालोचक), गुणलेखक, पंच आणि क्रिकेट समीक्षक बनू शकतो. हे ही पाहायाला मिळाले.
  • संस्था नुसतेच क्रिकेट सामने राबवित नाहीय. या स्पर्धां बरोब रच शैक्षणिक शिबीर, आरोग्य शिबीर, सांस्कृतिक कलावि ष्कार, रक्तदान, सहल असे विविध उपक्रम संस्थेच्या माध्य मातून राबविले जात आहेत.
  • त्याचे फायदेही समाजातील तरुणांना होत आहेत. आपली संस्था, आपला परिवार! मानत आपण एकमेकांच्या सुखदुः खाचा भाग आहोत.
  • तेव्हा सामाजिक कार्यात खारीचा वाटा असायला हवा. समा जऋण जपण्यासाठी सर्वांनी एकजुटीने या संस्थेला बळकट करण्याचा मनोदय यावेळी व्यक्त केला.
  • क्रिकेटच्या माध्यमातून एक तरी सक्रिय सदस्य संस्थेला जोडला जावा माणूस जोडण्याचे शिलेदार घडविण्याचे काम या स्पर्धेतून केले गेले सामाजिक लोकभावना जोपासणारे असंख्य युवक या समाजात आहेत.
  • या तरुणांमधील सुप्त गुण हेरून सामाजिक कार्यात संधी द्या यला हवी. क्रिकेट विभागीय पदाधिकारी शैलेश गुरव, योगेश करंबेळे, दशरथ तांबे, अविनाश तांबे, नितीन सूद, अमर गोरु ले या पदाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारीणीने दाखवलेला विश्वास सार्थ करून दाखवला स्पर्धा निर्विवादपणे पार पडली.
  • सर्व संघांनी खेळाडू वृत्ती दाखवत “एमपीव्हीएस क्रिकेट लीग २०२४” यशस्वीपणे संपन्न केली त्याबद्दल सहभागी संघांचे आणि क्रिकेट विभागाचे आभार मानण्यात आले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा