नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , पर्यटनस्थळांच्या पायाभूत सुविधांकडे लक्ष देण्याची गरज. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

पर्यटनस्थळांच्या पायाभूत सुविधांकडे लक्ष देण्याची गरज.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • रिपोर्टर: माधवी चंद्राकी :- र्औरंगाबाद : राज्याची पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात अजिंठा, वेरूळ, औरंगाबाद लेण्या, बिबिका मकबरा, दौलताबादचा किल्ला अशा जागतिक दर्जाच्या पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यांचा, तेथील पायाभूत सुविधांचा विकास करण्याची नितांत आवश्‍यकता आहे.
  • जगभरातील पर्यटक अजिंठा, वेरूळ, बिबिका मकबरा बघण्यासाठी येत असल्याने येथील या पर्यटनस्थळांभोवती असलेल्या सुविधा सुद्धा जागतिक दर्जाच्या असायल्या हव्या.
  • यात सुधारणा झाली तर पर्यटकांचा ओघ तर वाढेल शिवाय पर्यटनातून आणखी रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
    यासोबत मराठवाड्यातील सांस्कृतिक, धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांची सांगड घालून नवीन पर्यटनस्थळांची कनेक्टिव्हिटी देणे आवश्‍यक आहे.
  • अजिंठा, वेरूळसारख्या जागतिक दर्जाचा वारसा लाभलेल्या आणि पर्यटनाची राजधानी म्हणून कायमच गौरविल्या जाणाऱ्या औरंगाबादेत पर्यटकांचा मुक्काम मात्र सरासरी केवळ दीड दिवसाचाच आहे.
  • या स्थळांच्या विकासासाठी जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सीने कोट्यवधी रुपये खर्च केले आहे.
  • देशातील १२ आयकॉनिक साइट्‌समध्ये अजिंठा आणि वेरूळचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, लेण्याकडे जाणाऱ्या रस्त्यांकडे लक्ष देण्याची आवश्‍यकता आहे.
  • अजिंठा लेण्याकडे जाणारा रस्ता जवळपास २४ ठिकाणी अद्यापही अर्धवट आहे. ते काम तातडीने पूर्ण होणे आवश्‍यक आहे. तर, वेरूळ लेण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर ट्रॅफिक असते. लेण्यासमोरील चौकात ट्रॅफिक जॅमची समस्या आहे.
  • हॉटेल व्यावसायिकांना द्यावे प्रोत्साहन
  • पर्यटनस्थळांच्या तिकिटांची ऑनलाइन बुकिंग, जवळच्या हॉटेल्स, विमानतळ आणि दळणवळणाच्या साधनांची माहिती इंटरनेटवर सहजासहजी मिळाली, तर पर्यटकांचा ओढा वाढू शकेल.
  • विदेशी पर्यटकांना हवे असलेले अन्न पर्यटनस्थळांभोवती सहज उपलब्ध होईल, अशी योजना आखून हॉटेल व्यावसायिकांना त्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे.
  • इटालियन, कॉन्टिनेन्टल, मेक्‍सिकन असो वा चायनीज; भारतीय अन्नाच्या जोडीला सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ पर्यटकांना मिळाले पाहिजेत.
  • पर्यटकांसाठी नाइट लाइफचाही त्या दृष्टीने विचार व्हायला हरकत नाही. कोट्यवधी रुपये खर्चून पर्यटक सुविधा केंद्रे उभारण्यात आली खरी; पण पर्यटकांना तिथे समाधानकारक सुविधा नाही.
  • मराठवाड्यातील किल्ल्यांकडे लक्ष देण्याची गरज
  • औरंगाबादेतील देवगिरी किल्ला, गौताळा अभयारण्यातील अंतूर, सुतोंडा, जंजाळा, वेताळवाडी हे किल्ले, नांदेड जिल्ह्यात कंधार आणि रामगड (माहूर), लातूर जिल्ह्यात उदगीर आणि औसा, उस्मानाबाद जिल्ह्यात परंडा आणि नळदुर्ग, बीडचा किल्लेधारूर असे वीसेक डोंगरी आणि भुईकोट किल्ले मराठवाड्यात आहेत, त्याकडे सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे.
  • औरंगाबादेत याकडे लक्ष देण्याची गरज
  • ऐतिहासिक गेट, नहर ए अंबरीसोबत इतर नहरी, थत्ते हौद, सलीम अली सरोवर, खंडोबा मंदिर (सातारा), घृष्णेश्‍वर मंदिर (वेरूळ), भद्रा मारोती मंदिर, हजरत जर जर जरी बक्ष दर्गा (खुलताबाद), नाथ मंदिर, शहागंज घड्याळ, हिमरू शाल, औरंगाबादेतील खाद्य संस्कृती, शहरातील वस्तुसंग्रहालय, हिमायतबाग, दिवाण देवडी, ऐतिहासिक चबुतरे, शहानूरमिया दर्गा, वेरूळ गढी, शहरातील ऐतिहासिक महल यांच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
  • येथे पायाभूत सुविधांसोबत पर्यटनस्थळ म्हणून ब्रँडिंगची गरज आहे.
  • पर्यटनासाठी काय करायला हवे?
  • जी-२० च्या पार्श्‍वभूमीवर अजिंठा लेणीकडे जाणाऱ्या रस्त्याचे अर्धवट काम पूर्ण होणे आवश्‍यक आहे.
  • वेरूळच्या चौकात ट्रॅफिक जाम होते, पर्यटकांच्या दृष्टीने नियोजन हवे.
  • बिबिका मकबरा ते औरंगाबाद लेणी रस्त्याचे संथगतीने सुरू असलेले काम तातडीने व्हावे – टाऊन हॉल ते मकाई गेट रस्त्याची दयनीय अवस्था, रोज हजारो पर्यटक इथून घाणीतून जातात.
  • महमूद दरवाजाच्या कामामुळे पाणचक्की रस्ता बंद, पर्यटकांना फेरा मारून जावे लागत आहे.
  • पैठण रस्त्याची दुरवस्था झालेली आहे, रस्त्याचे लवकरच चौपदरीकरण होणे आवश्‍यक आहे.
  • देवगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या अतिक्रमणांचा विळखा काढावा.
  • औरंगाबादेतील हॉटेलचे दर मुंबई-पुणेपेक्षा कमी असावेत.
  • रिक्षा, टॅक्सीचालकांना ड्रेसकोड, नियमावली हवी
  • विमानतळ, पर्यटन अधिकाऱ्यांच्या कामाचे ॲनालिसेस हवे.
  • विदेशातील पर्यटनस्थळांविषयी ऑडिटोरियममध्ये लघुपटाच्या माध्यमातून माहिती दिली जाते.
  • याच पद्धतीने स्थानिक संस्कृती, परंपरा, वैशिष्ट्यांची माहिती लोककलेच्या माध्यमातून देणे गरजेचे.       
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा  https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा