
संगणक परिचालकांचे काम बंद आंदोलनाची निवेदन माननीय गटविकास अधिकारी तसेच सभापती साहेब यांना दिले : ग्रामपंचायतीच्या डिजिटल सेवेला फटका.
- प्रतिनिधी : सडक अर्जुनी : प्रदीप धावले :-ग्रामपंचाय त स्तरावर मागील १४ वर्षापासून ग्रामीण भागातील नाग रिकांना विविध डिजिटल सेवा उपलब्ध करून देणाऱ्या संगणक परिचालकांनी बुधवारपासून राज्यभर बेमुदत ‘काम बंद आंदोलन’ सुरू केले आहे.

- ऑगस्ट ते नोव्हेंबर २०२५ या चार महिन्यांचे मानधन थ कीत असणे, कोरोना काळातील विमा संरक्षण व प्रोत्सा हन भत्ता न मिळणे तसेच कंपनीचा १८ सप्टेंबर २०२५ रोजी संपलेला करार यासारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर शा सनाकडून होत असलेल्या दुर्लक्षाविरोधात हे आंदोलन आहे.

- ग्रामपंचायतींचे ऑनलाईन ऑफलाईन कामकाज, जन्म-मृत्यू दाखले, विवाह प्रमाणपत्र देणे, यासारखी महत्त्वाची व तांत्रिक कामे ते सातत्याने आणि प्रामाणिकपणे करत आहेत.

- तसेच शासनाच्या विविध महत्वकांक्षी योजना जनतेपर्यत पोहोचवण्याचे काम ते करत आहेत.
- आयष्मान भारत स्वच्छ भारत मिशन, घरकुल आवास योजना अशा योजना राबविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.

- त्यांना केवळ ९ हजार ९०० रुपये मानधन मिळते. महागा ईच्या काळात मानधन तुटपुंजे रक्कम असल्याची खंत सं गणक परिचालकांनी व्यक्त केली. त्यातही मानधन वेळेवर न मिळाल्याने परिचालक अडचणीत आर्थिक सापडले आहेत.

- मान्य झालेल्या ३ हजार ३०० पगारवाढीची तत्काळ अंम लबजावणी करावी, कोरोना काळात मृत्यूमुखी पडलेल्या परिचालकांच्या कुटुंबीयांना ५० लाखांचे विमा कवच, तसे च कोरोनाकाळात जीवाची बाजी लाऊन केलेल्या कामा साठी २३ महिन्यांचा प्रोत्साहन भत्ता देण्याची मागणी त्यांनी १८ सप्टेंबर २०२५ रोजी कंपनीचा करारही संपला आहे.

- याशिवाय, संगणक परिचालकांना ‘ग्रामपंचायत सहाय्यक’ असा शासकीय किंवा निमशासकीय दर्जा द्यावा, तोपर्यंत किमान वेतन कायदा लागू करावा.
- आदी मागण्यांचे निवेदन सहाय्यक गटविकास अधिकारी दिलीप खोटे ले तसेच सभापती चेतनजी वडगाये यांना देण्यात आले.

- यावेळी महाराष्ट्र ग्रामपंचायत परिचालक संगणक संघटने चे तालुकाध्यक्ष डेबुजी बावनकर उपाध्यक्ष अमर परशुराम कर, सचिव प्रकाश वैरागडे, तसेच सर्व संगणक परिचा लक आदींची उपस्थिती होती.

- ‘काम बंद’ आंदोलनामुळे ग्रामपंचायतींचे डिजिटल काम काज, विविध दाखले आणि इतर तांत्रिक प्रक्रिया ठप्प राहणार आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











